Happenings

अंधारावर मात करत लाखो रातरागिणी उतरल्या रस्त्यावर

दै.दिव्य मराठीतर्फे करण्यात आले होते नाईट वॉक चे आयोजन

वर्षातील सर्वात मोठी रात्र म्हणजे २२ डिसेंबर. या दिवशी राज्यातील २२ पेक्षा अधिक शहरात लाखो महिलांनी उत्स्फर्तपणे नाईट वॉक केला. दैनिक दिव्य मराठीच्या वतीने आयोजित या अभियानात पोलीस प्रशानासह अनेक महिला संघटनांनी सहभाग नोंदवला तसेच अत्याचारांविरूध्द जनजागृती केली. काही महिला एकत्रितपणे तर काही एकट्याच या वॉकमध्ये सहभागी झाल्या होत्या.

सर्वसामान्य महिलांच्या हस्ते उद्घाटन
शहरातील विवध क्षेत्रात काम करणाऱ्या सामान्य रातरागिणींच्या हस्ते नाईट वॉकचे उद्घाटन करण्यात आले. यात शहरातील पहिली ऑटाेरिक्षा चालक महिला अनिता पारपेल्ली, टीव्ही सेंटर येथील पेट्रालेपंपावर काम करणाऱ्या उषा घाेरपडे, शेतकरी शांता बरसाले, चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील आशा शिरसाट, मुक्त पत्रकार अश्विनी भोयर, शिवछत्रपती पुरस्कार विजेती बुध्दीबळ पटू साक्षी चितलांगे, निमलष्करी दलाच्या कॅप्टन ऋचिका जैन, महिला वाहक खापर्डे, स्काऊट प्रमुख रजनी यंाचा समावेश होता. यावेळी, पोवाडा, मल्लखांब, ढाेल पथके, तलावारबाजी, शास्त्रीया नृत्य अशा अनेक विविध कलागुनदर्शनाचे सादरीकरण करण्यात आले.
महापौर नंदकुमार घोडेले, पोलीस अयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त मीना मकवाना, एसीपी नागनाथ कोडे, राज्य संपादक संजय आवटे, निवासी संपादक दिपक पटवे, आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी नम्रता फलके यांची प्रमुख उपस्थिती होती. दै.दिव्य मराठी तर्फे राबवण्यात आलेला हा उपक्रम अतिशय एनर्जेटीक आणि प्रेरणादायी होता. अशा प्रकारच्या प्रतिक्रीया सहभागी महिलांकडून येत होत्या.

Related Articles

Close