Features
वैष्णवी घाटनांद्रेकरला युगप्रवर्तक प्रतिष्ठानचा पुरस्कार
औरंगाबादची विद्यार्थीनी बालकवियत्री वैष्णवी घाटनांद्रेकर हिला पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या घोडेगाव येथील युगप्रवर्तक प्रतिष्ठानचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात उल्लेखणीय कार्य केल्याबद्दल तिला हा सन्मान मिळाला आहे. चित्रपट अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
युगप्रवर्तक प्रतिष्ठातर्फे शिक्षण , कला , क्रीडा, चित्रपट, नाटक, समाजसेवा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त युगप्रवर्तक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो . वैष्णवी घाटनांद्रेकरला प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खरात आणि मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विधान परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विठ्ठलराव टिंगरे, बाळासाहेब रणपिसे, सिनेदिग्दर्शक नागेश पवार, कुमार लोखंडे यांची उपस्थिती होती.
वैष्णवी घाटनांद्रेकर एस.बी. ओ.ए.शाळेची विद्यार्थिनी असून इयत्ता आठवीत शिकत आहे. वैष्णवीचा भरारीस आमुच्या नभ थिटे हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. तिचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या यशाबद्दल जय साहित्य प्रतिष्ठानचे मार्गदर्शक किशोर लव्हेकर, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, रमेश ठाकूर, राजीव मासरुळकर, अनिल सवाई, अविनाश वाघमारे, संदीप ढाकणे, संजय घोगरे, मुख्याध्यापिका सुरेखा माने, राजश्री मॅडम, स्वाती मॅडम यांनी अभिनंदन केले आहे.