Breaking News

अब्दुल सत्तार यांचा राजीनामा

मी राज्यमंत्री आहे, त्यामुळे किमान माझ्या मतदारसंघातील निर्णय मला घेऊ द्या; जिल्हा परिषदेच्या सदस्यांची भूमिका काय आहे, हे मला समजून घेऊ द्या. प्रत्येक वेळी आम्ही शिवसेनेचे जुने नेते आहोत म्हणून स्वतः निर्णय घेत असेल, तर मी कशाला पक्षात राहू, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यामुळे शिवसेनेमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शुक्रवारी विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्जदाखल केला. त्यांना भाजपच्या सर्व सदस्यांचे पाठबळ मिळाले. सोबतच काँग्रेसमधून फुटलेले अब्दुल सत्तार समर्थकांनीही देवयानी डोणगावकर यांच्या बाजूने मतदान केले. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीचा आणि काँग्रेसचा अध्यक्ष होऊ नये म्हणून खबरदारी घेतली होती, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर रात्री उशिरा अब्दुल सत्तार यांची माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भेट घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांची नाराजी समोर आली आहे.

Related Articles

Close