Visit Our Website
Today's Special

६ ऑगस्ट – आज हिरोशिमा दिन.

६ऑगस्ट २०१८ दिनविशेष

वार : सोमवार( दुपारी ०२.०८ ते रात्री ८.५८ पर्यंत.)

शके : १९४०

सुर्योदय : ०६.१६

सुर्यास्त : १९.१३

नक्षत्र : कृतिका

तिथी : कृ. नवमी.

६ ऑगस्ट दिनविशेष

१९४५ : हिरोशिमा दिन. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर जगातील पहिला अणुबॉंम्ब टाकला.

६ ऑगस्ट १९४५ हा मानवाच्या इतिहासातील अतिशय दुर्दैवी दिवस. मित्र राष्ट्रांनी जपानमधील एक संपन्न शहर हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकून सा-या जगाला स्तब्ध केले. या बॉम्बचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की, तीन लाख वस्तीचे हे शहर नष्ट झाले. एका बॉम्बने मनाची शांती झाली नाही म्हणून ९ ऑगस्टला दुसरा बॉम्ब नागासाकी शहरावर टाकण्यात आला. विज्ञानानेच मानवाच्या आत्मविश्वासावर केलेला तो मोठा हल्ला होता. मानवाच्या क्रुरतेपुढे मानवाच्या साहस व शौर्याला पराजय पत्करावा लागला. जपानने या बॉम्ब हल्ल्यानंतर सपशेल शरणागती पत्करली.

६ ऑगस्ट – इतर काही दिनविशेष.

१५३८ : गाँझालो हिमेनेझ दि केसादाने कोलंबियामध्ये बोगोटा शहराची स्थापना केली.
१८०६ : शेवटच्या पवित्र रोमन सम्राट फ्रांसिस दुसर्‍याने पदत्याग केला व पवित्र रोमन साम्राज्याचा शेवट झाला.
१८२५ : बोलिव्हियाला स्पेनपासून स्वातंत्र्य.
१८६१ : ब्रिटनने नायजेरियाचे लागोस शहर बळकावले.
१८९० : न्यू यॉर्कच्या ऑबर्न तुरुंगात विल्यम केमलरला विजेचे झटके देउन मृत्युदंड.
१९१४ : पहिले महायुद्ध – सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
१९१७ : पहिले महायुद्ध – माराशेष्टीची लढाई.
१९२६ : हॅरी हुडिनीने पाण्याखाली एका सीलबंद पेटीत ९१ मिनिटे राहून नंतर सुटका करून घेतली.
१९४५ : दुसरे महायुद्ध – अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर एनोला गे या नावाच्या विमानातून लिटल बॉय नाव दिलेला परमाणु बॉम्ब टाकला. अंदाजे ७०,००० क्षणात ठार तर अजून हजारो पुढील काही वर्षांत भाजल्याने व किरणोत्सर्गाने मृत्युमुखी.
१९६० : क्युबाची क्रांती – अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला उत्तर म्हणून क्युबाने अमेरिकेसह सगळ्या परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.
१९६२ : जमैकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
१९६६ : ब्रॅनिफ एरलाइन्स फ्लाइट २५० हे विमान नेब्रास्कातील फॉल्स सिटीजवळ पडले. ४२ ठार.
१९९० : पहिले अखाती युद्ध – कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.
१९९७ : कोरियन एरलाइन्स फ्लाइट ८०१ हे बोईंग ७४७-३०० प्रकारचे विमान गुआमच्या विमानतळावर उतरताना कोसळले. २२८ ठार.
१९०६ : श्री. अरविंद घोष यांनी ‘वंदे मातरम’ हे नियतकालीक सुरु केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close