Visit Our Website
Today's Special

५ ऑगस्ट- आज अभिनेत्री काजोल चा जन्मदिवस.

५ ऑगस्ट २०१८ दिनविशेष

वार : रविवार

शके : १९४०

सुर्योदय : ०६.१६

सुर्यास्त : १९.१३

नक्षत्र : कृतिका

तिथी : कृ. अष्टमी

५ऑगस्ट दिनविशेष.

१९७४ : अभिनेत्री काजोलचा जन्म दिवस

काजोल देवगण (पूर्वीचे नाव: काजोल मुखर्जी, जन्म: ५ ऑगस्ट १९७४) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. आपल्या अभिनयासाठी काजोलने आजवर ६ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत ज्यांपैकी विक्रमी ५ पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री ह्या श्रेणीमध्ये आहेत. २०११ साली भारत सरकारने काजोलला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.
१९९२ सालच्या बेखुदी ह्या चित्रपटामधून काजोलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९३ साली शाहरूख खानसोबतचा बाजीगर हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. त्यानंतर १९९५ साली आदित्य चोप्राने आपल्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ह्या चित्रपटामध्ये काजोलला आघाडीची भूमिका दिली. ह्या चित्रपटाच्या तुफान यशामुळे काजोल यशाच्या व कीर्तीच्या शिखरावर पोचली. ह्यानंतरच्या काळात करण जोहरने काजोल व शाहरूख खान जोडीसोबत अनेक यशस्वी चित्रपट काढले.

५ ऑगस्ट- इतर काही दिनविशेष

१९१४ : जगातील पहिला विद्युतचलित वाहतूक नियंत्रक दिवा अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरात सुरू झाला.
२००६ : मराठी विकिपिडीयाने ५,००० लेखांचा टप्पा ओलांडला.
११०० : हेन्री पहिला इंग्लंडच्या राजेपदी.
१३०५ : स्कॉटिश क्रांतीकारी विल्यम वॉलेस ग्लासगो जवळ पकडला गेला.
१८६० : कार्ल चौथा स्वीडनच्या राजेपदी.
१८६१ : अमेरिकन यादवी युद्ध – युद्धाच्या खर्चास हातभार लागावा म्हणून अमेरिकन सरकारने प्रथमतः आयकर लागू केला.
१८८२ : जपानमध्ये लश्करी कायदा लागू.
१९०१ : पीटर ओ’कॉनोरने २४ फूट ११.७५ ईंच लांब उडी मारून विश्वविक्रम रचला.
१९४४ : दुसरे महायुद्ध – ऑस्ट्रेलियाच्या कौरा गावाजवळील युद्धबंद्यांच्या तुरुंगातून ५४५ जपानी युद्धबंदी पळाले. बव्हंशी मारले गेले व उरलेल्यांपैकी मोठ्या संख्येने आत्महत्या केली.
१९४४ : ज्यूंचे शिरकाण – पोलिश क्रांतीकार्यांवनी वॉर्सोतील कारागृहातून ३४८ बंद्यांची सुटका केली.
१९४९ : इक्वेडोरमध्ये भूकंप. ६,००० ठार.
१९६० : बर्किना फासोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
१९६२ : मॅरिलिन मन्रोने आत्महत्या केली.
१९६२ : दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेलाला कैद. २८ वर्षांनी १९९०मध्ये सुटका.
१९६४ : व्हियेतनाम युद्ध – अमेरिकेच्या यु.एस.एस. टिकोंडेरोगा व यु.एस.एस. कॉन्स्टेलेशन या विमानवाहू युद्धनौकांवरील विमानांनी टोंकिनच्या अखातातील हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून उत्तर व्हियेतनामवर बॉम्बफेक केली. वस्तुतः टोंकिनच्या अखातातील हल्ला ही बनावट घटना होती.
१९८९ : एका दिवसात ५००८ बाटल्या रक्त शिबीरामध्ये जमा करण्याचा जागतिक विक्रम पुणे येथे केला गेला.
१९९५ : क्रोएशियाच्या सैन्याने सर्बियातील क्निन शहर जिंकले.
२०१२ : अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ओक क्रीक शहरातील गुरुद्वारामध्ये घुसून एका माथेफिरूने गोळीबार केला. सहा व्यक्ती ठार. हल्लेखोराला पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close