Visit Our Website
Breaking News

कचऱ्याच्या समस्येवर MH20 न्यूजचे सर्वात मोठे सर्वेक्षण : ६७ % नागरीकांच्या मते राजकरणामुळे झाली औरंगाबादची कचरा कोंडी

अार्थिक व्यवहार, प्रशासकिय अनास्था आणि शहरवासीयांचा थंडपणाही कारणीभूत

औरंगाबाद शहराच्या तब्बल ६ महिन्यांपासून झालेल्या कचरा कोंडीला जबाबदार कोण? काहींना वाटेल नारेगावचा कचरा डेपो बंद होणे, काहींना वाटेल कचरा संकलनातील अडचणी तर काहींना यामागे प्रशासनाची अनास्था असेही कारण वाटू शकते. मात्र, ज्यांच्या खांद्यावर शहराचा रहाटगाडा ओढण्याची जबाबदारी आहे त्या राजकरण्यांनीच शहराची कचरा कोंडी वाढवल्याचे तब्बल ६७ टक्के शहरवासीयांना वाटते. शहराच्या कचरा प्रश्नावर औरंगाबादेत पहिल्यांदाच MH20 न्यूजने घेतलेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली. या सर्वेक्षणातून राजकरण्यांविषयची  सर्वसामान्यांच्या मनातील चिडच दिसून आली. यामुळे येत्या निवडणूकीत सत्तेची वाट कचऱ्यातून जाणार हे निश्चित.

आैरंगाबाद शहराची १६ फेब्रुवारीपासून कचरा कोंडी झाली आहे. १९८५ पासून नारेगावच्या ४३ एकर जागेवरील कचरा डेपोत शहरातला कचरा टाकला जात होता. यास नागरीकांनी वेळोवेळी विरोध केला. मात्र, फेब्रुवारी महिन्यात नारेगावकरांच्या संयमाचा बांध फुटला आणि कचरा डेपो कायमचा बंद झाला. यानंतर अख्ख्या शहराचीच कचरा कुंडी झाली. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगार साचू लागले. पालिकेने पडेगाव, हर्सूल, नक्षत्रवाडीपासून अगदी कन्नडपर्यंत कचरा डेपोसाठी जागा शोधली. मात्र, प्रत्येक ठिकाणी विरोध पत्करावा लागल्याने कचरा काही केल्या कमी झाला नाही. हतबल पालिका दररोज कचरा कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, यावर काही केल्या मार्ग सापडत नाहीय.

कचऱ्याच्या समस्येवरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतांना ज्यांना याचा दररोज त्रास सहन करावा लागतोय त्यांना नेमके काय वाटते हे MH20 न्यूजने जाणून घेतले. सहा महिन्यांच्या कचरा कोंडीसाठी जबाबदार कोण यासाठी MH20 न्यूजने औरंगाबादेत पहिल्यांदाच ‘बोला औरंगाबादकर बोला’ हा वाचकांचा कौल घेतला. यातील निष्कर्ष राजकरण्यांसाठी धोक्याची घंटा आहे.

बारा हजाराहून अधिक वाचकांनी दिला कौल

MH20 न्यूज पोर्टलवर ‘बोला औरंगाबादकर बोला’ या सदरात ‘औरंगाबादचा कचरा प्रश्न का सुटत नाही’ हा प्रश्न विचारण्यात आला. त्यास पाच पर्याय देण्यात आले. त्यावरील उत्तरावर क्लिक करताच प्रत्येकक प्रश्नाला मिळालेला प्रतिसाद दिसत हाेता. आठवडाभर हा प्रश्न पोर्टलवर ठेवल्यानंतर आज त्याचे विश्लेषण करण्यात आले. सात दिवसात १२, ७८९ वाचकांनी यावर मतदान केले. त्यातील निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत-

-६३.२७ टक्के उत्तरदात्यांना राजकरण हेच कचरा कोंडीचे मोठे कारण वाटते. MH20 न्यूज पोर्टलवर आलेल्या वाचकांच्या प्रतिक्रियात शिवसेना-भाजपमधील राजकरणाला यासाठी जबाबदार ठरवण्यात आले आहे. दाेन्ही पक्ष श्रेय घेण्याच्या नादात शहराला कचऱ्यात ढकलत असल्याचे वाचकांचे मत पडले आहे. तर या प्रकारावर विरोधकांचे मौनही वाचकांना पटत नाहीय.

-६.१२ टक्के उत्तरदात्यांनाच सामान्य नागरीकांना विश्वासात न घेता केलेली कारवाई यास कारणीभूत वाटते. खरंतर पालिकेने आतापर्यंत ठरवलेल्या नविन ठिकाणांवर कचरा टाकण्याची कारवाई थेट सुरू केली. यासाठी तेथील रहिवाशांचे मत जाणून घेतले नाही. मात्र, याचा कचरा कोंडी वाढवण्यावर फार परिणाम पडल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले.

-१०.२० टक्के उत्तरदात्यांच्या मते प्रशासिकय अनास्थेमुळे कचरा कोंडी वाढली आहे.

-१०.२० टक्के उत्तरदात्यांचे आर्थिक व्यवहार जुळून न आल्याने हा प्रश्न वाढत चालल्याचे मत आहे.

-१०.२० टक्के उत्तरदात्यांनी थेट नागरीकांच्या थंडपणामुळे हा प्रश्न मार्गी लागत नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

औरंगाबादचा कचरा प्रश्न का सुटत नाही ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close