Today's Special

४ सप्टेंबर- राजकारणातील भीष्माचार्य दादाभाई नौरोजी यांचा आज जन्मदिन

गुगलची आजच्या दिवशी स्थापना झाली.

४ सप्टेंबर २०१९ दिनविशेष

वार : बुधवार

सुर्योदय : ०६.२४

सुर्यास्त : १८.५१

नक्षत्र : विशाखा

तिथी : शु. षष्ठी

४ सप्टेंबर दिनविशेष

राजकारणातील भीष्माचार्य दादाभाई नौरोजी यांचा आज जन्मदिन

राजकारणातील भीष्माचार्य दादाभाई नौरोजी हे विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी ॲन्ड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया (अर्थ: भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसदसदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय ए.ओ. ह्यूम व दिनशा एडलजी वाच्छा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते.

आजच्या दिवशी गुगल ची स्थापना झाली

स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गूगल ची स्थापना केली.

Google एक अमेरिकन बहुराष्ट्रीय सार्वजनिक कंपनी आहे, ज्याने इंटरनेट सर्च , क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि जाहिरात सिस्टीममध्ये गुंतवणूक केली आहे. हे इंटरनेटवर आधारित अनेक सेवा आणि उत्पादने तयार करते आणि विकसीत करते आणि हे नफा प्रामुख्याने त्याचा जाहिरात कार्यक्रम अॅडवर्डस कमवत असतो. कंपनीची स्थापना स्टॅनफर्ड विद्यापीठ , लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांच्या दोन पीएचडी विद्यार्थ्यांनी केली . त्यांना ब-याचदा “Google Guys” म्हटले जाते. सप्टेंबर ४, १९९८ रोजी एका खाजगी कंपनीत हा समावेश करण्यात आला. त्याची प्रथम सार्वजनिक काम / सेवा १९ ऑगस्ट, २००४ रोजी सुरु झाली. त्याच दिवशी, लैरी पेज, सर्जी ब्रिन आणि एरिक श्मिट यांनी पुढील वीस वर्षात (२०२४) Google वर एकत्र काम करण्याचे मान्य केले. २००६ पासून, कंपनीचे मुख्यालय माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया मध्ये आहे .

४ सप्टेंबर – इतर दिनविशेष

२०१३ : रघुराम राजन यांनी ’रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’चे २३ वे गव्हर्नर म्हणुन पदभार हाती घेतला.
२००१ : Hewlett Packard या कंपनीने संगणक क्षेत्रातील Compaq Corporation ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.
१९९८ : स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी ’गुगल’ची स्थापना केली.
१९७२ : मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.
१९३७ : व्हेनिसमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ’प्रभात’च्या ’संत तुकाराम’ या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली. इतर दोन चित्रपट होते ऑस्ट्रेलियाचा ’फ्लाइंग डॉक्टर’ आणि हंगेरीचा ’मारिया नोव्हेर’.
१९०९ : बालवीर (Scout) चळवळीचा पहिला मेळावा झाला. लॉर्ड बेडन पॉवेल यांनी सुरू केलेली ही चळवळ थोड्याच काळात जगभर पसरुन लोकप्रिय झाली.
१८८८ : जॉर्ज इस्टमन याने ’कोडॅक’ हा ट्रेडमार्क नोंदवला व फिल्म कॅमेर्‍याचे पेटंट घेतले.
१९७१ : लान्स क्लूसनर – दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू
१९६२ : किरण मोरे – यष्टीरक्षक
१९५२ : ऋषी कपूर – अभिनेता
१९४१ : सुशीलकुमार शिंदे – केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
१९३७ : शंकर सारडा – साहित्यिक व समीक्षक
१९१३ : परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर – प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९९८)
१२२१ : श्री चक्रधर स्वामी – महानुभाव पंथाचे संस्थापक (मृत्यू: ७ फेब्रुवारी १२७४)

 

Related Articles

Close