Visit Our Website
Today's Special

४ ऑगस्ट – किशोर कुमार यांचा आज जन्मदिवस

ऑगस्ट २०१८ दिनविशेष

वार : शनिवार (शुभ दिवस)

शके : १९४०

सुर्योदय : ०६.१६

सुर्यास्त : १९.१३

नक्षत्र : अश्विनी

तिथी : कृ. सप्तमी

४ आॅगस्ट दिनविशेष.

१९२९ : पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार , निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता पटकथा लेखक आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचा आज जन्म दिवस. (मृत्यु १३ ऑक्टोबर १९८७).

किशोर कुमार यांचा जन्म मध्य प्रदेशातील खांडवा या गावी झाला. त्यांचे नाव आभास कुमार ठेवण्यात आले. त्यांचे वडील कुंजलाल गांगुली हे वकील होते, आई गौरीदेवी या एका श्रीमंत घराण्यांतील होत्या. अशोक कुमार बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध झाल्यावर, गांगुली परिवारांचे मुंबई दौरे वाढत गेले. आभास कुमार यांनी याच वेळी आपले नाव किशोर कुमार ठेवून आपल्या

फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. बोंम्बे टॉकीज मध्ये ते समूहगायक म्हणून काम करीत. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट “शिकारी” (इ.स. १९४६) होता. या चित्रपटात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोर कुमार यांना “जिद्दी” (इ.स. १९४६) या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. यानंतर किशोर कुमार यांना गाण्याच्या बर्‍याच संधी मिळाल्या.

किशोर कुमार यांचा अभिनेता म्हणून शेवटचा चित्रपट “दूर वादियों में कहीँ” होता. राहुल देव बर्मन व राजेश रोशन यांच्या पाठिंब्याने अमित कुमार १९८० च्या दशकात आघाडीचे पार्श्वगायक बनले. याच वेळी किशोर कुमार यांनी अनिल कपूर च्या पहिल्या चित्रपटासाठी (वे सात दिन) व तसेच त्याच्या पहिल्या सुपरहिट चित्रपटासाठी (मिस्टर इंडिया) गायिले. तसेच त्यांनी आर. डी. बर्मन साठी सागर ची प्रसिद्ध गाणी गायली.

किशोर कुमार यांनी ८१ चित्रपटात काम केले आहे. त्यांचे अभिनेते म्हणून गाजलेले चित्रपट – पडोसन (१९६८), दूर गगन की छाँव में (१९६४), गंगा की लहरें (१९६४), मिस्टर एक्स इन बाँम्बे (१९६४), हाफ टिकट (१९६२), मनमौजी (१९६२), झुमरू (१९६१), चलती का नाम गाडी (१९५८), दिल्ली का ठग (१९५८), आशा (१९५७), न्यू दिल्ली (१९५६), बाप रे बाप (१९५५), मिस माला (१९५४),  नौकरी (१९५४)

ऑगस्ट इतर दिनविशेष

१७३० : पानिपतच्या तिस-या युध्दातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचा जन्म ( मृत्यु १४ जानेवारी १७६१)
१८४५ : कायदेपंडीत,  समाजसुधारक, व राजकीय नेते , उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फारोजशहा मेहता यांचा जन्म (मृत्यु ५ नोव्हेंबर १९१५)
१८६३ : पातंजलीच्या संस्कृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेव शास्त्री यांचा जन्म
१८८८ : भारतीय धर्मगुरू ताहेर सैफुद्दीन यांचा जन्म (मृत्यु १२ नोव्हेंबर १९६५)
१८९४ : साहित्यीक व वक्ते नारायण सीताराम म्हणजेच ना. सी फडके यांचा जन्म (मृत्यु २२ ऑक्टोबर १९७८)
१९३१ : यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन ताम्हाणे यांचा जन्म (मृत्यु १९ मार्च २००२)
१९५० : भारतीय वकील आणि राजकारणी एन . रंगास्वामी यांचा जन्म.
१९६१ : अमेरिकेचे ४४ वे आणि कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते बराक आेबामा यांचा जन्म.
१९७८ : भारतीय राजकारणी संदीप नाईक यांचा जन्म.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close