Visit Our Website
Today's Special

३१ जुलै – आजच्या दिवशी औरंगजेब मुघल सम्राट बनला.

३१ जुलै २०१८ दिनविशेष.

वार : मंगळवार ( अंगारीका संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ९.४०, शुभ दिवस सकाळी ८.४२ नंतर. )

शके : १९४०.

सुर्याेदय : ०६.१५

सुर्यास्त : १९.१५

नक्षत्र : शततारका.

तिथी : कृ. तृतीया.

३१ जुलै दिनविशेष.

१६५८: आजच्या दिवशी औरंगजेब मुघल सम्राट बनला.  ३१ जुलै १६५८ पासून त्याचा शासन काळ सुरु झाला.

औरंगजेब (इ.स. १६१८ – इ.स. १७०७) हा मोगल सम्राट होता. ३१ जुलै १६५८ पासून त्याचा शासन काळ सुरु झाला. त्याने त्या वेळी आपल्या राज्यात शरियत (इस्लामी कायदा) लागू केला होता. गैर-मुसलमान जनतेवर असा कायदा लागू करणारा तो पहिला मुसलमान राज्यकर्ता होता.तसेच त्याने जिझिया कर परत लागू केला. त्याने आपल्या आयुष्यातील बराच काळ दक्षिणेत मराठा साम्राज्यावर आणि इतर विरोधकांवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्‍नांत घालवला.

३१ जुलै – इतर काही दिनविशेष

१४९८: पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युपोपीय ठरले.
१६५७: मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.
१६५८: औरंगजेब मुघल सम्राट बनला.
१८५६: न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्ट चर्चची स्थापना.
१९३७: के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहाँ हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमधे प्रदर्शित झाला.
१९५४: इटालियन गिर्यारोहकांनी के-२ (माउंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर प्रथमच सर केले.
१९५६: कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला.
१९६४: रेंजर ७ अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.
१९९२: जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९९२: सतार वादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
२०००: वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार प्रदान.
२००१: दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार प्रदान.
२००६: फिदेल कॅस्ट्रो यांनी आपल्या भावाला, राऊल यांच्याकडे सत्ता हस्तगत केली.
२०१२: मायकेल फेल्प्स यांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सर्वाधिक पदक जीकाण्याचा विक्रम मोडला.

लक्ष्मणरामचंद्र पांगारकर यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९४१)
१८८०: हिन्दी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९३६)
१८८६: अमेरिकन अ‍ॅनिमेशन चित्रपट निर्माते फ्रेड क्विम्बे यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९६५)
१९०२: व्यंगचित्रकार आणि लेखक केशवा तथा के. शंकर पिल्ले यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९८९)
१९०७: प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून १९६६)
१९१२: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रिडमन यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर २००६)
१९१८: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल २०००)
१९१९: भारतीय क्रिकेटपटू हेमू अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००३)
१९४१: गुजरातचे माजी मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट २००४)
१९४७: हिंदी चित्रपट अभिनेत्री मुमताज यांचा जन्म.
१९५४: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मनिवंनान यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून २०१३)
१९६५: हॅरी पॉटर च्या लेखिका जे. के. रोलिंग यांचा जन्म.
१९९२: आहारतज्ज्ञ श्रेया आढाव यांचा जन्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close