Visit Our Website
Today's Special

२९ जुलै- आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

२९ जुलै २०१८ दिनविशेष.

वार : रविवार

शके : १९४०.

सुर्याेदय : ०६.१४

सुर्यास्त : १९.१६

नक्षत्र : धनिष्ठा

तिथी : कृ. द्वितीया

२९ जुलै दिनविशेष.

आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन.

रशियातील सेंट पीटर्सबर्ग मध्ये २०१० साली झालेल्या वाघांविषयीच्या शिखर परिषदेत या दिवसाची घोषणा केली गेली. वाघांना संरक्षण पुरवण्यासाठी संबंधित देशांसहित इतरांनीही साहाय्य केले आहे. या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे असा आहे.
भारतीय पट्टेरी वाघ जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांपैकी एक मानला जातो. परंतु, अनिर्बंध शिकार आणि अधिवासावरील अतिक्रमणांमुळे त्यांची संख्या अत्यंत रोडावली आहे. गेल्या शतकात माणसाने वाघांची अनिर्बंध शिकार केलीच; शिवाय जंगलतोड आणि अतिक्रमण करून वाघांच्या अधिवासाचे क्षेत्रही कमी केले; परिणामी, अन्नासाठी जवळच्या वस्त्यांवर वाघ हल्ले करू लागले आणि माणूस- वाघ संबंध आणखीच बिघडले. नामशेष होण्याच्या जवळपास पोहचलेला वाघ जतन करण्याची आवश्यकता यामुळेच निर्माण झाली आहे.

२९ जुलै – इतर काही दिनविशेष.

१८५२: पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्‌गाते म्हणून जोतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.
१८७६: फादर आयगेन, डॉ. महेंद्र सरकार यांनी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सची स्थापना केली.
१९२०: जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरांदरम्यान सुरू झाली.
१९२१: अॅडॉल्फ हिटलर नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टीचे नेते बनले.
१९४६: टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया असे नामकरण झाले.
१९४८: १२ वर्षांच्या काळखंडानंतर लंडन येथे १४व्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या.
१९५७: इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सीची स्थापना झाली.
१९८५: मल्याळम लेखक टी. एस. पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९८७: भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या करण्यात आल्या.
१९९७: हरनाम घोष कोलकाता, स्मृतिचिन्ह पुरस्कार दिलीप पुरुषोत्तम चित्रे या मराठी साहित्यिकास प्रथमच मिळाला.
१८८३: इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १९४५)
१८९८: नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ इसिदोरआयझॅक राबी यांचा जन्म.
१९०४: जे. आर. डी. टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा जन्म. भातीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९९३)
१९२२: लेखक आणि शिवशाहीर ब. मो. पुरंदरे यांचा जन्म.
१९२५: व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा जन्म.
१९३७: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ डॅनियेल मॅकफॅडेन यांचा जन्म.
१९५३: भजन गायक अनुप जलोटा यांचा जन्म.
१९५९: हिंदी चित्रपट अभिनेता संजय दत्त यांचा जन्म.
१९८१: स्पॅनिश f१ रेस कार ड्रायव्हर फर्नांडो अलोन्सो यांचा जन्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close