Today's Special

२९ ऑगस्ट – आज राष्ट्रीय क्रीडा दिवस

आज मातृदिन

२९ ऑगस्ट २०१९ दिनविशेष

वार : गुरुवार(बृहस्पती पूजन, पिठोरी अमावस्या, अमावस्या प्रारंभ रात्रौ ७.५५)

सुर्योदय : ०६.२३

सुर्यास्त : १८.५६

नक्षत्र : आश्लेषा

तिथी : कृ. चतुर्दशी

आज मातृदिन.

भारतामध्ये श्रावण अमावस्येच्या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. आपल्या आईबद्दल आदर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. भारतीय संस्कृतीमध्ये मातेच स्थान अतिशय उच्च असल्याचे सांगण्यात आलेले आहे. माता ही आपली सर्वश्रेष्ठ गुरु मानली गेली आहे. ह्या दिवशी आई मुलांना सर्वातित कोण?…आणि मुलगा म्हणतो मी.. असे म्हणून मुलाला वाण देते आणि मुलं आईच्या पाया पडुन आशिर्वाद घेतात.

२९ ऑगस्ट दिनविशेष

आज राष्ट्रीय क्रीडा दिवस.

आज २९ ऑगस्ट हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस. देशातील सर्व खेळाडूंचे प्रेरणास्थान असलेल्या हॉकीपटूचा जन्म दिवस आपल्या देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी अलहाबाद येथे झाला. भारतीय हॉकीतील नव्हे तर हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. हॉकीतील जादूगार अशीच त्यांची जगभरात ओळख आहे. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, प्रोत्साहन मिळावे तसेच देशाच्या कानाकोप-यात खेळाची जागरुकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात येतो.

२९ ऑगस्ट – इतर दिनविशेष

१९७४ : चौधरी चरणसिंग यांनी ’भारतीय लोक दल’ या राजकीय पक्षाची स्थापना केली.
१९४७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष झाले. १९१८ : लोकमान्य टिळक यांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
१८९८ : ’गुडईयर’ कंपनीची स्थापना झाली.
१८३३ : युनायटेड किंगडमने आपल्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.
१८३१ : मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electromagnetic Induction) शोध लावला.
१८२५ : पोर्तुगालने ब्राझिलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
१४९८ : वास्को द गामाने कालिकतहुन पोर्तुगालला परतण्याचा निर्णय घेतला.
१९५८ : मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, अभिनेता (मृत्यू: २५ जून २००९)
१९२३ : रिचर्ड अ‍ॅटनबरो – इंग्लिश निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते १९१५ : इन्ग्रिड बर्गमन – स्वीडीश अभिनेत्री (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८२)
१९०१ : पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील – सहकारमहर्षी (मृत्यू: २७ एप्रिल १९८०)
१८८० : लोकनायक माधव श्रीहरी तथा ‘बापूजी’ अणे (मृत्यू: २६ जानेवारी १९६८)
२००८ : जयश्री गडकर – अभिनेत्री (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२)
२००७ : बनारसी दास गुप्ता – स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री (जन्म: ५ नोव्हेंबर १९१७)
१९८६ : गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म: १५ जून १८९८)
१९८२ : इन्ग्रिड बर्गमन – स्वीडीश अभिनेत्री (जन्म: २९ ऑगस्ट १९१५)
१९७६ : काझी नझरुल इस्लाम – स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक व हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी. पश्चिम बंगालमधील असनसोल-दुर्गापूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देण्यात येणार आहे. (जन्म: २५ मे १८९९)
१९७५ : इमॉन डी व्हॅलेरा – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: १४ आक्टोबर १८८२)
१९६९ : मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर (जन्म: २० आक्टोबर १९१६)
१९०६ : बाबा पद्मनजी मुळे – ख्रिस्ती धर्मप्रसारक, ग्रंथकार व मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक (जन्म: ? मे १८३१)

Related Articles

Close