Visit Our Website
Today's Special

१ ऑगस्ट – आज अण्णा भाऊ साठेंची जयंती.

आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी.

१ ऑगस्ट २०१८ दिनविशेष

वार : बुधवार

शके : १९४०

सुर्योदय : ०६.१५

सुर्यास्त : १९.१४

नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा

तिथी : कृ. चतुर्थी

१ ऑगस्ट दिनविशेष.

१९२० : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. (मृत्यू:१८ जुलै १९६९)

तुकाराम भाऊराव साठे (ऑगस्ट १, इ. स. १९२० – जुलै १८ इ. स. १९६९)  हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. साठे एका अस्पृश्य मांग समाजामध्ये जन्मलेले एक दलित होते, आणि त्यांची उपज आणि ओळख त्यांचे लेखन आणि राजकीय कृतीशीलतेचे केंद्रबिंदू होते. अण्णाभाऊ साठेंचा जन्म सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला.

साठे पहिल्यांदा कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित होते. डी.एन. गवंकर आणि अमर शेख या लेखकांसोबत ते लालबावटा कला पथक या तमाशा नाट्यप्रसाराचे सदस्य होते, ज्याने सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. ते १९४० च्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अब्राम्स यांच्यानुसार, भारतातील साम्यवादाच्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची “१९५० च्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना” होती. भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, “ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!” इंडियन पीपल्स थिएटर एसोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती. आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य (बॉम्बे राज्य) निर्माण करण्याची मागणी केली होती.

१ ऑगस्ट २००१ रोजी भारतीय पोस्टाने विशेष ₹४ टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते. पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक आणि कर्ला मधील एक उड्डाणपूल यासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.

१९२० : लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी (जन्म: २३ जुलै १८५६ रत्‍नागिरी)

बाळ गंगाधर टिळक ( जुलै २३, इ.स. १८५६ – ऑगस्ट १, इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक आणि वक्ते होते. ‘लोकमान्य’ या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. टिळकांचा जन्म रत्नागिरी मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. चिखलगाव हे त्यांचे मुळ गाव. बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी पत्रकारितेत मोठे योगदान दिले. तथापि, त्यांनी पुण्यातील प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका महत्वपूर्ण ठरली . तत्कालीन भारतीय नेतृत्त्वात भारतास स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते. इंग्रजांशी जुळवून घेउन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे हा मतप्रवाह मवाळवाद समजला जातो तर इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करुन वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे हा मतप्रवाह जहालवाद समजला जातो. टिळक जहालवादी होते. टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) ही त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्‌गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. मंडाले येथून सुटल्यावर ‘पुनश्च हरी ओम्’ ची गर्जना करून टिळकांनी कार्य सुरू केले. लखनौ करार घडवून हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखवून दिले. अशा जहाल विचारसरणीच्या देशभक्ताची १ ऑगस्ट १९२० रोजी मुंबई येथील सरदारगृहात प्राणज्योत मालवली.

१ ऑगस्ट – इतर काही दिनविशेष.

२००१ : सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. ३ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाचे औपचारिक उद्‍घाटन झाले.
१९९६ : कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते व निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
१९९४ : भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली. जगातील अशा तर्‍हेची ही पहिलीच योजना आहे.
१९६० : इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.
१९४४ : पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.
१९१४ : पहिले महायुद्ध – जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
१८७६ : कोलोरॅडॊ अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.
१७७४ : जोसेफ प्रिस्टले व कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.
१९५५ : अरुणलाल – क्रिकेटपटू व समालोचक
१९५२ : यजुर्वेंद्र सिंग – क्रिकेटपटू
१९३२ : महजबीन बानो ऊर्फ ’मीनाकुमारी’ – अभिनेत्री (मृत्यू: ३१ मार्च १९७२)
१९२४ : सर फँक वॉरेल – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू (मृत्यू: १३ मार्च १९६७)
१९१५ : श्री. ज. जोशी – कथाकार व कादंबरीकार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष (मृत्यू: ? ? ????)
१९१३ : भगवान आबाजी पालव ऊर्फ ’मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (मृत्यू: ४ फेब्रुवारी २००२)
१८९९ : कमला नेहरू – जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९३६)
१८८२ : पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्‍न (१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष (मृत्यू: १ जुलै १९६२)
१८३५ : महादेव मोरेश्वर कुंटे – कवी व संस्कृतचे प्राध्यापक. ’राजा शिवाजी’ हे त्यांचे काव्य विशेष गाजले. (मृत्यू: ८ आक्टोबर १८८८ – पुणे)
२००८ : हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य (जन्म: २३ मार्च १९१६)
२००८ : अशोक मांकड – क्रिकेटपटू (जन्म: १२ आक्टोबर १९४६)
२००५ : फहाद – सौदी अरेबियाचा राजा (जन्म: १६ मार्च १९२१)
१९९९ : निराद सी. चौधरी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९७५) बंगाली/इंग्लिश लेखक. १९५१ मधे त्यांचे ’अ‍ॅन आटोबायोग्राफी ऑफ अ‍ॅन अननोन इंडियन’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्याच्या १४ आवृत्त्या निघाल्या. (जन्म: २३ नोव्हेंबर १८९७ – किशोरगंज, म्यामेनसिंग, बांगला देश)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close