In Short
श्री साईबाबा सेवा मंडळाच्या वतीने साईचरित्र पारायण
एन ११ हडको येथील दीपनगरातील श्री साईबाबा सेवा मंडळाच्या वतीने, साई मैदान दि.१ ते ८ फेब्रुवारीदरम्यान भव्य साईचरित्र पारायण व संतचरित्र कथा, हरिकीर्तन व मोफत रोगनिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नियमित कार्यक्रमात पहाटे ५ वाजता काकडा आरती, ५.१५ ते ७.१५ पर्यंत अध्याय वाचन, ७.३० ते ९ पर्यंत अध्याय वाचन, सकाळी ९ ते १२ या कालाधीत रोग निदान शिबीर, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ, धूपआरती, ८ वाजता हरिकीर्तन सोहळा पार पडेल, हभप. सर्वदर्शनाचार्य विठ्ठल महाराज चनघटे यांच्या मार्गदर्शनाखाली व हभप. ज्ञानेश्वर महाराज गायकवाड यांच्या सुमधूर वाणीतून साईचरित्र पारायण वाचले जाणार आहे. आठ दिवसांच्या कालावधीत हभप. गोविंद महाराज गोरे (आळंदी), विनोदाचार्य नामदेव महाराज पोकळे (पैठण), रोहिदास महाराज म्हस्के (परभणी), कि.भु. भगवान महाराज (गडदे आळंदी), महंत महादेव महाराज गिरी (अंतरवाळी), वेदांताचार्य महंत स्वामी विवेकानंद महाराज शास्त्री (शिरूर), महादेव महाराज बोराडे (केज), सर्वदर्शनाचार्य विठ्ठल महाराज शास्त्री यांची कीर्तनसेवा पार पडेल. शनिवारी दि.८ सकाळी ७ वाजता पालखी मिरवणूक सोहळा पार पडेल. सकाळी ११ वाजता काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वाटप करण्यात येईल.