Happenings

कोणावर टीका करण्यासाठी नाहीतर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण – पंकजा मुंडे

नवीन सरकारला नुकतेच शंभर दिवस झाले आहे. यामुळे कोणावरही टीका, टिपणी करण्यासाठी हे उपोषण करण्यात येत नाही तर मराठवाड्यातील शेतकरी, तरुणांचे हीत भविष्यासाठीचे विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण करण्यात येत असल्याचे भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
मराठवाड्यातील पाणी तसेच सिंचन या प्रश्नासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयवर सोमवार दि.27 रोजी लाक्षणिक उपोषण केले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, महादेव जानकर,खासदार प्रीतम मुंडे, माजी सुरजितसिंग ठाकूर, आ.नारायण कुचे, आ. अभिमन्यू पवार, आ.प्रशांत बंब, आ. मेघना बोर्डेकर, आ.संतोष दानवे, शिरीष बोराळकर, पाशा पटेल, शहर अध्यक्ष किशचंद तनवाणी यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक दशकापासून मराठवाडा हा विविध कारणांनी दुष्काळ ग्रस्त राहिला आहे. या साठी भाजप सरकारनी मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध योजना राबविण्यात आल्या.यात वॉटरग्रीड, जलयुक्त शिवार, आदी योजनांसाठी कामे केली आहेत.परंतु सध्याच्या सरकारने या सर्व योजनांना स्थगिती दिली आहे. यामुळे मराठवाड्यातील हक्काच्या पाण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण करण्यात येत आहे. तसेच नवीन मुख्यमंत्र्यांचे नुकतेच 100 दिवस झाले आहे. त्यामुळे सरकारवर व कोणावर टीका, टिपणी करणे माझा हेतू नाही असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच मराठवाड्यातील विविध प्रश्नांसाठी मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी जाणार आहे. व महाराष्ट्रातील विविध विषयावर आंदोलन करण्यात येतील असे पंकजा पालवे मुंडे म्हणाल्या.

Related Articles

Close