In Short

राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे १ फेब्रुवारी रोजी आयोजन

अपना क्लब संस्कार प्रतिष्ठानतर्फे ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांंसाठी संस्कार प्रतिष्ठानतर्फे शनिवार १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ३१ जानेवारी पर्यंत संबधित संघांनी किंवा वैय्यक्तीक स्वरूपात भेट घेवून नाव नोंदवण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी देशभक्तीपर गीत हिंदी अगर मराठीत असावे, गीत तीन ते पाच मिनिटांचे व तोंडपाठ असावे, गीतासोबत काही वाद्यांची साथ लागत असेल तर त्या त्या गटाने आपली सोय करावी,गीत सादर करणाऱ्या गटामध्ये १० पेक्षा जास्त विद्यार्थी असू नये. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्यास अनुक्रमे रूपये ५००, ३००, व २०० चे रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील., स्पर्धकांनी वेळेच्या १५ मिनिटे अगोदर हजर राहावे,या स्पर्धा समर्थनगर येथिल वरद मंदिर येथिल सांस्कृतिक सभागृह येथे घेण्यात येणार आहे.या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी डॉ. शैलजा देव, रेनबो कलेक्शन, सावरकर पुतळ्याजवळ, समर्थनगर कॉर्नर, येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Close