In Short

परशुराम सेवा संघच्या वतीने राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध

परशुराम सेवा संघच्या सर्व पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक राष्ट्रीय कार्याध्यक्ष उल्हास अकोलकर यांच्या निवासस्थानी झाली .या बैठकीत काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या रामलीला मैदान दिल्ली येथील मेगा रॅलीमध्ये बोलतांना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द काढून त्यांचा अपमान केल्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. राहुल गांधी यांनी समाजाच्या व सावरकर प्रेमींच्या भावना दुखावल्या  त्याबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा परशुराम सेवा संघ याविरोधात गुन्हा नोंदवेल. असे नमूद करून पत्रकाद्वारे परशुराम सेवा संघच्यावतीने राहुल गांधी यांचा जाहिर निषेध करण्यात आला. या प्रसंगी परशुराम सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मुळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष ऊल्हास अकोलकर,राष्ट्रीय उपाध्यक्ष मोरेश्वर सदाव्रते, युवा प्रदेश संघटक केदार पाटील, प्रदेश महिला उपाध्यक्षा उत्तरा अकोलकर, मराठवाडा महिला उपाध्यक्षा अंजुषा कुलकर्णी, युवा मराठवाडा उपाध्यक्ष ऋषिकेश सराफ, जिल्हा मार्गदर्शक सदाशिवजी देशमुख, जिल्हाध्यक्ष विकास गोरवाडकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर तुंगार, शहराध्यक्ष सागर खेर्ङेकर, शहर कार्याध्यक्ष महेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष वसंत किनगावकर, शहर उपाध्यक्ष रामचंद्र अंधारकर, दिगंबर पाठक, नारायण पांङव, मिलींद घण महिला शहर अध्यक्षा शिल्पा गोखले, महिला शहर कार्याध्यक्षा जयश्री अकोलकर, महिला शहर संघटक पल्लवी नव्हाङे, महिला शहर उपाध्यक्षा शिल्पा देशपांडे, सुप्रिया जोशी, अंजली जोशी, युवा शहराध्यक्ष अभिषेक इंदापुरकर,यांची उपस्थिती होती.

Related Articles

Close