Happenings

विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

सुशिलादेवी देशमुख विद्यालय

सुशीलादेवी देशमुख विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव चेतन माने यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापिका बी.जे.पैलवान आदी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी कवायती, लेझीम, देशभक्तीपर गीते, कृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी शिक्षक संघाचे रवी अन्नदाते, ज्योती जोशी, सुनंदा होनराव, संगीता घुगे, यु.जी थेटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम व्ही देसले यांनी केले. तर आभार एस एन खरात यांनी मानले.

एम एस पब्लिक स्कूल

एम एस पब्लिक स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून डॉ मनोज मुनेश्वर, कवी रामप्रसाद वावळ, लक्ष्मण शिंगणे यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संदीप शिंगणे यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश राठोड यांनी केले. तर प्रास्ताविक वंदना तानवडे यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

श्री बालाजी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय

श्री बालाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. चिकलठाणा येथील शाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब जाधव पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका ज्योती नाडे, किसनराव दहीहंडी आदींची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी मदन नवपुते, चंदन साळवे, भाऊसाहेब बकाल, रमेश धांडे, जगन्नाथ रिठे, वैशाली जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्याने देशभक्तिपर गीते सादर केली. यावेळी मुख्याध्यापक आर व्ही हंकारे, पर्यवेक्षक पी जे बारहाते, बप्पासाहेब जाधव आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस के कुलकर्णी यांनी केले. तर आभार एन व्ही पवार यांनी मानले.

विश्वभारती कॉन्व्हेंट प्राथमिक विद्यालय

विश्वभारती कॉन्व्हेंट प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी सविता थोरात, बाळू औताडे, फारुख पटेल, संस्थेचे अध्यक्ष विलास जाधव, उपाध्यक्ष कविता जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सुधा घोडके यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणा मोरे, प्रतिक्षा औताडे यांनी केले. तर आभार ज्योती डोळस, भारती जगताप यांनी मानले.

पी . के अण्णा पाटील प्राथमिक शाळा

पी के अण्णा पाटील प्राथमिक शाळा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव महेश पालवे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संदीप बुधवंत, शिवाजी चक्रे, साहेबराव कोकाटे यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी लोंढे यांनी केले. तर आभार जितेंद्र गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

औरंगाबाद पब्लिक स्कूल

औरंगाबाद पब्लिक स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली होती. भारत माता की जय अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली होती. यावेळी बाळू काळे, संस्थेचे अध्यक्ष ऋषींदर दाभाडे यांची कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थिती होती. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सुखदेव दाभाडे. मुख्याध्यापिका मनीषा दाभाडे यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्रीडा व कलाप्रकारात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पडघनकर यांनी केले. यावेळी शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

दादोजी कोंडदेव माध्यमिक विद्यालय

दादोजी कोंडदेव माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शिवाजी चव्हाण हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर मते पाटील, दिगंबर खराडकर यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. कार्यक्रमा नंतर विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी खो खो, हस्तकला, रांगोली, सांस्कृतिक कार्यक्रम आदींचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा जाधव यांनी केले. तर आभार आशा आगलावे यांनी मानले.

कै गणपतराव जगताप विद्यामंदिर

कै गणपतराव जगताप विद्यामंदिर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मोहन नाना साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राकेश गांगुर्डे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापिका सविता पाटील या होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भारत माता, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे वेशपरिधान करून करून शाळेत हजेरी लावली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भानुदास मालवाड, कुलदीप नागे, किशोर लंबे, दत्तात्रय बिरादार, अंजू शर्मा, बळीराम मरनांगे, प्रीती वैष्णव आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता वाकळे यांनी केले. तर आभार रामेश्वर इत्थर यांनी मानले.

शारदा हिंदी माध्यमिक विद्यालय

शारदा हिंदी माध्यमिक विद्यालय येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी रिपेश पारकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी मेघना पारकर मुख्याध्यापक व्ही.पी कुलकर्णी यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आर एन सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अंबर पॅरामेडिकल ज्युनिअर कॉलेज

अंबर पॅरामेडिकल ज्युनिअर कॉलेज येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष शेख सोहेल मुर्तुझा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ शेख नाजनीन यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ डी एल गाठे यांच्यासह व्ही सी पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फरहा आली, विद्या गायकवाड, अजहर पठाण, अखिल फारुकी, सईद खान आदींनी परिश्रम घेतले.

अनंत भालेराव विद्या मंदिर

अनंत भालेराव विद्या मंदिर शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. डॉ अरुणा रघुत्तम खारकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्काऊट गाईड ध्वजारोहण स्काऊट गाईड कॅप्टन सोनल नलावडे, भक्ती चौथे, अभिषेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शशिकला बोराडे, मुख्याध्यापिका श्रुती कुलकर्णी, सचिव बकुल देशपांडे, डॉ सविता पानट, दिपाली संचेती, डॉ विनिता पानसे, मंगला चरखा, डॉ सुधा कुलकर्णी, सोनल नलावडे, संगीता साठे आदींची उपस्थिती होती. संगीत शिक्षिका सविता मनोरकर यांनी त्यांच्या विद्यार्थ्यालह संगित बध्द केलेल्या देशभक्तीपर गीते विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

शंभुराजे विद्यालय

शंभूराजे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त अधिकारी तुकाराम ईश्वर के आर मुळीक यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत कृष्णाजी मुळीक संस्थेचे अध्यक्ष व्हि डि मोरे यांची उपस्थिती होती यावेळी दहावी बोर्ड परीक्षेत प्रथम आलेल्या सोमय्या युनूस पठाण या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी घुंगरू काठी लेझीम डंबेल्स कवायत करून दाखवल्या यावेळी महापुरुष आणि प्रमाणे विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून शाळेत हजेरी लावली होती हे त्यात सिद्धांत जाधव स्वराज साळुंखे यश वाघ शिवाजी गरुड वैभव उदाहरण रक्षिका वाकेकर प्रांजल राठोड नंदिनी राठोड पूजा इंगळे रोहन शिंगटे अनिकेत सुराशे उद्धव नेहरकर आणि विद्यार्थ्यांचा समावेश होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेबी केंद्रे यांनी केले तर आभार एमडी बिरादार यांनी मानले

Related Articles

Close