Visit Our Website
Features

पवित्र रमझानच्या महिन्यात अाहे जकातीला महत्त्व, गरजूंच्या शोधासाठी अौरंंगाबादेत मिळाले आधुनिक रूप, सर्वेक्षणातून घेतला जातोय शोध

मुस्लिम बांधवांची आगळी वेगळी समाजसेवा, ८ वर्षापासून जकातीतून अदा केली जातेय शाळेची फीस, पुस्तके, लग्नाच्या खर्च, उभे केले व्यावसायीक

फाईल फोटो
फाईल फोटो

रमझानच्या पवित्र महिन्यात दानधर्म म्हणजे जकात देण्याला खुप महत्व आहे. मात्र, बऱ्यायाचदा हे दान चूकीच्या हातात गेल्याने  खरे गरजू मागे राहुन जातात. हे टाळण्यासाठी एक संस्था गेल्या सहा वर्षांपासून जकातीसाठी गरजंूचे सर्वेक्षण करत आहे. यासाठी मुस्लिम वस्त्यांमध्ये एक अर्ज वाटून गरजूंची माहिती घेतली जाते. ही नावे जकात देण्यासाठी इच्छेक दानशूरांकडे पाठवली जातात. गेल्या ८ वर्षात ५०० हुन अधिक जणांना या पद्धतीने मदत मिळाली असून अनेक संसार स्वत:च्या पायावर उभी राहिली.

जकात चूकीच्या हातात पडल्यामुळे देणाऱ्याचा पाक उद्देश सफल होत नाही. ही बाब लक्षात आल्यामुळे तंझीम-फारीगाने-ए-जामीयात या स्वंयसेवी संस्थेने जकात खऱ्या हकदारांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वेक्षणाचा विचार केला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. मौलाना अब्दुल रशीद नदवी आणि सचीव मिर्जा अब्दुल कय्युम नदवी यांनी यासाठी मुसतहकीन जकात फॉर्म तयार केला आहे. मुसतहकीन जकातचा अर्थ जकातचे खरे गरजु असा होतो. उर्दु आणि हिंदीत असणार्या या फॉर्ममध्ये शहरातील सर्वच मुस्लिम वस्तीतील गरीब कुटूँबाची माहिती घेण्यात  येते. यात कुटूँबप्रमुखाचे नाव, कुटूँबातील सदस्य संख्या, मासिक उत्पन्न, घर किरायाचे आहे की स्वत:चे, घरातील विवाहित, अविवाहीत अपत्यांची संख्या, अवंलबुंन असणारी व्यक्ति आदीचा समावेश असतो. रमझान सुरू होण्याच्या दोन महिने पूर्वीपासून हे काम सुरू होते.

 

Mirza Abdul Kayyum Nadvi

जकात घेणार देणारा व्हावा

जकात देण्यासाठी खूप लोकं तयार असतात. त्यांची मदत योग्य हातात पडावी म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला आहे. शहरात सुरू केलेला हा उपक्रम एक मॉडेल बनुन राज्यात सर्वत्र पोहचणे आवश्यक आहे. जकात घेणाऱ्याने स्वंयपूर्ण होऊन आपल्या पायावर उ•भे रहावे. भविष्यात तो ही जकात देण्याचा स्थितीत यावा, हाच यामागील उद्देश आहे.-मिर्झा अब्दुल कय्युम नदवी, औरंगाबाद

 

२५० सदस्यांची मदत

तंझीमचे शहरात २५० हुन अधिक सदस्य आहेत. हे सर्वच सर्वेक्षणासाठी मदत करतात. जमा झालेल्या फॉर्मची छाननी केली जाते. यातून कोणाला मुला-मुलींचे लग्न,  शाळा कॉलेजची फिस, पुस्तके, किराणा, औषधोपचार, क्लासची फिस, व्यावसायासाठी भाांडवल आदीसाठी पैशांची गरज आहे याची माहिती मिळते. केवळ फॉर्ममधील माहितीवर अवलंबून न राहता त्या-त्या परिसरातील मशीदीतले मौलवी आणि पेशेमाम यांचा सल्ला घेतला जातो. मौलवींना मोहल्ल्यातील प्रत्येक व्यक्तिची संपुर्ण माहिती असते. समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांचे मतही विचारात घेतले जाते. यातून अंतीम झालेली नावे दानशुरांना कळवली जातात. संस्थेचा संबंध केवळ दानशुरांना नावे कळवण्या इतपत असतो. प्रत्यक्ष मदत दानशूरच करतात. ८ वर्षांपासुन हा उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत जकात घेणाऱ्यात फकीर, भिकारी आदींचा समावेश असायचा. परंतू तंझीममुळे ती खऱ्या गरजुंना मिळू लागली आहे. आतापर्यंत ४५० ते ६०० लोकांना याचा लभ मिळाला आहे.

जकातीने नूर पालटला

-दोन वर्षांपूर्वी या उपक्रमाअंतर्गत एका दानशूराने चिकलठाना जवळच्या हिनानगर येथिल शेख नुर यांना १५०० रूपयांची जकात दिली. यातुन त्यांनी घरातच इस्त्रीचे दुकान टाकले. सुरूवातीला त्यांनी घरोघरी जाऊन कपडे गोळा केले. आता लोकं स्वत:हुन त्यांच्याकडे कपडे आणतात.  दिवसाकाठी ते ४०० ते ५०० रूपये कमवतात.

-किमान  ३० ते ३५ जणांना हातगाड्या टाकण्यासाठी दिड-दोन हजार रूपये दिले. हे लोकं आता सकाळी जाधववाडीतून •भाज्या आणून विकतात. दिवसाकाठी ३००-४०० रूपये कमवतात.

-एका जणाला वेल्डिंगचे दुकान टाकण्यासाठी ३ हजार रूपये दिले. हा व्यक्ती दररोज ८०० ते १०००   रूपये कमवतो. हा व्यक्ती आता स्वत: इतरांना जकात देतो.

-शहरातील एक नामांकित  डॉक्टर आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत एक व्यक्ती गेल्या पाच वर्षांपासून नमाज पढवणारे पेशेमाम अशा ७०जणांना ३ हजार रूपये तर आजान देणाऱ्यांना २ हजार रूपये देतात. सोबतीला कपडे, जेवण आदीची व्यवस्थाही करतात.

 

Related Articles

5 thoughts on “पवित्र रमझानच्या महिन्यात अाहे जकातीला महत्त्व, गरजूंच्या शोधासाठी अौरंंगाबादेत मिळाले आधुनिक रूप, सर्वेक्षणातून घेतला जातोय शोध”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close