Features

‘तिरून’चा क्रूझ रोड शो औरंगाबादकडे रवाना

रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनलचे भारताचे एकमेव प्रतिनिधी असलेल्या ‘तिरून’ ट्रॅव्हल मार्केटिंगने 2019-2020 मध्ये सिंगापूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रूझ लाईनर, रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनलच्या जलपर्यटनाविषयी हा संदेश पोहोचवण्यासाठी भारतभरात एक भव्य रोड शो सुरू केला आहे. या प्रवासाचा एक भाग म्हणून, रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनलची दोन सर्वोत्कृष्ट जहाजे, व्हॉएजर ऑफ द सीज आणि क्वॉन्टम ऑफ द सीज या जहाजांवरील आगामी सिंगापूर समुद्रपर्यटना विषयी व्यापारी भागीदारांना माहिती देण्यासाठी आज वेलकम हॉटेल रामा इंटरनॅशनल औरंगाबाद येथे रोड शो आयोजित करण्यात आला. वर्षभर पाहुण्यांना सुट्टीचा चांगला अनुभव देण्यासाठी सिंगापूरच्या खाडीवर वैशिष्ट्यीकृत दोन जहाजे नांगरण्यात आली आहेत. औरंगाबादव्यतिरिक्त, ‘तिरून’ने अलीकडेच दिल्ली, पुणे, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, कोची आणि बंगळूर येथे रोड शो आयोजित केले असून या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत इंदूर, रायपूर, चंदीगड, नागपूर, लुधियाना, हैदराबाद, मुंबई आणि जयपूर येथेही असे कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आहे.

व्हॉएजर ऑफ द सीज या व्हॉएजर क्लासमधील जहाजांचे आघाडीचे जहाज अलीकडेच तब्बल 97 मिलियन डॉलर खर्चून पुन्हा तयार केले गेले असून त्यामध्ये पर्यटकांना थरार अनुभवता यावा  आणि त्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी अनेक अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. जहाजांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हाय-ऑक्टेन अॅलडव्हेंचर राईड्स, द परफेक्ट स्टॉर्म वॉटर स्लाईड्स व अलीकडे लॉन्च केलेल्या बॅटल फॉर प्लॅनेट झेड लेझर टॅग गेम सारखे फॅमिली-फोकस्ड एन्टरटेन्मेंट पर्याय देखील समाविष्ट आहेत. जहाजावर फ्लोराइडर सर्फ सिम्युलेटर, रॉक-क्लायबिंग वॉल आणि मिनी-गोल्फ सह इतर अॅषक्शन-पॅक्ड आकर्षणे आहेत. या जहाजामध्ये विश्रांती आणि कायाकल्पतेसाठी व्हायटॅलिटी स्पा आणि फिटनेस सेंटर, लहान मुलांसाठी नर्सरी आणि लहान टॉट्स आणि कुमारांसाठी अॅ्डव्हेंचर ओशन प्रोग्राम आहे. खाद्य प्रेमींसाठी जेवणाचे भरपूर पर्याय. व्हॉएजर ऑफ द सीज 21 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण प्रशांत महासागरावरुन सिंगापूरहून मलेशिया आणि थायलंडला 3-नाईट आणि 4 नाईट क्रूझने प्रवास करणार आहे आणि 8 मे -19 जून 2020 रोजी उन्हाळ्यात परत येईल.

दक्षिण प्रशांत महासागरामध्ये सिंगापूरमधील सर्वात मोठे आणि सर्वात क्रांतिकारक जहाज म्हणजे क्वांटम ऑफ द सीज आपल्याला भरपूर अॅपडव्हेंचरची खात्री देते. अठरा डेक असलेले हे जहाज नऊशे अतिथींना सामावून घेऊ शकेल आणि 21नोव्हेंबर 2019 पासून 26एप्रिल 2020 पर्यंत मलेशिया आणि थायलंडमध्ये प्रवास करेल. कार्यक्रमात मलेशिया किंवा फुकेट 4 रात्रीचे जलपर्यटन, क्वालालंपूर (पोर्ट क्लांग), पेनांग आणि फुकेट 5-रात्र जलपर्यटन, क्वालालंपूर (पोर्ट क्लांग), पेनांग आणि फुकेटचे 7-रात्रीचे जलपर्यटन आणि बॅंकॉक आणि हो ची मिन्ह सिटी चे 7-रात्र जलपर्यटन यांचा समावेश आहे.

या स्मार्ट जहाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि आकर्षणे – नॉर्थ स्टार’ ही समुद्राच्या सपाटीपासून 300 फूट वर चढणारी एक निरीक्षण कॅप्सूल, ‘टू 70’ – एक परिपूर्ण हाय-टेक मनोरंजन स्थळ, ‘बायोनिक बार’ येथे रोबोटद्वारे प्रदान केलेली कॉकटेल, स्काय डायव्हिंग आणि समुद्रातील सर्फिंग सिम्युलेटर आणि ‘सीप्लेक्स’, समुद्रातील सर्वात मोठे इनडोर गेमिंग स्पेस – जे बास्केटबॉल कोर्ट, रोलर-स्केटिंग, बम्पर कार्स, सर्कस स्कूल आणि इतर. या जहाजात जगभरातील पाककृती उपलब्ध असणारी 18 रेस्टॉरंट्स देखील आहेत जी खाण्यापिण्याच्या शौकिनांसाठी एक पर्वणीच आहे.

Related Articles

Close