Breaking News

शहरात उमटले दिल्लीच्या आंदोलनाचे पडसाद

नागरीकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीमध्ये पेटलेल्या आंदेालनाचे आैरंगाबादेतही पडसाद उमटले. सोमवारी (दि. १६) डॉ. बाबासाहेब अांबेडकर मराठवाडा विद्यापिठ मध्ये विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन छेडत विद्यापीठ बंद केले. औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी साडेअकरा वाजेदरम्यान स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया, सत्यशोधक संघटना, सम्यक विद्यार्थी आंदोलन आदी संघटनांनी आंदोलनाला सुरूवात केली.
बॉटनिकल गार्डनजवळ डॉ. बाबाासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून दिल्ली पोलीस मुर्दाबाद, आरएसएस मुर्दाबाद, नही चलेगी नही चलेगी हुकूमशाही नही चलेगी, अशा डफच्या तालावर घोषणा देत प्रशासकीय इमारतीकडे आंदोलकांनी धाव घेतली आणि विद्यापीठ बंद पुकारला. आंदोलकांनी शैक्षणिक विभाग, मुख्य ग्रंथालय आाणि अभ्यासिका बंद ठेवण्याचे आवहन केले. हे आंदेालन चिघळत असल्याचे लक्षात येताच बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रमुख आदोलक विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्याने तणापूर्ण शांतता निर्माण झाली. यामुळे परीसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.  तसेच विद्यापिठातील पंडीत दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्राच्या फलकाला नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडीयाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत काळे फासले. यावेळी जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या

Related Articles

Close