Visit Our Website
Breaking News

बकरी ईद निमीत्त केरळच्या पूरग्र्रस्तांना मदतीचे आवाहन, पावसासाठी दुआ

औरंगाबादेत ईद-उल-जुहा उत्साहात साजरी, गरीबांना दान देऊन मुस्लिम बांधवांनी साजरा केला आनंद

औरंगाबाद शहरात आज मुस्लिम बांधवांनी ईद-उल-जुहा म्हणजेच बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी शहरातील मशिदी आणि ईदगाहामध्ये प्रेम, बंधुत्व आणि सलोखा शाबूत राहण्यासाठी अल्लाहकडे याचना करण्यात आली. देशात काही ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. तर काही ठिकाणी दुष्काळासदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक संकटातून मार्ग काढण्यासाठी मुस्लिम बांधवांनी दुआ मागीतली. तर केरळमध्ये आलेल्या जलप्रपातात अडकलेल्या नागरीकांसाठी मदतीचे आवाहनही करण्यात आले.

मुस्लिम धर्माचे दोन महत्त्वपूर्ण सण आहेत, एक ईद उल फितर तर दुसरी ईद-उल-जुहा. ईद उल फितर ईद हा आनंद साजरा करण्याची सण आहे. तर ईद-उल-जुहा हा त्यागाचा, अल्लाहच्या प्रती प्रेम आणि समर्पणाची भावना व्यक्त करण्यासाठीचा सण म्हणून साजरा केला जातो. यालाच बकरी ईद असेही म्हणतात. या सणानिमीत्त आज सकाळी ७ वाजेेपासून मशिदी आणि ईदगाहामध्ये नमाज अदा करण्यात आली. यात प्रामख्याने छावणी, रोजेबाग, उस्मानपुरातील ईदगाह, शहानूरमिया दर्गा, रेल्वेस्टेशन मशीद, कटकट गेट, मशीद बाशेरजंग, काली मशीद सिटी चौक, मशीद गंजे बायजीपुरा, मशीद निझामुद्दीन औलिया, मशीद हजरत शाह अहमद शुत्तारी मोंढा, आलमगीर मशीद, नुरानी मशीद, उस्मानिया मशीद आदी ठिकाणी ईद-उल-जुहाची विशेष नमाज अदा करण्यात आली.

मुस्लीम बांधवांनी नातेवाईक व मित्र-मंडळींच्या घरी जाऊन मिठाईची देवाण-घेवाण करत ईदच्या शुभेच्छा दिल्या. तरअनेक ठिकाणी बकरीची कुर्बानी देण्यात आली. अनेक मुस्लीम बांधवांनी गरिबांना दान दिले.

केरळातील पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन
विशेष नमाजनिमीत्त खुदबा म्हणजेच धार्मिक प्रवचनात धर्मगुरूंनी विविध विषयांवर भाष्य केले. ईदगाह रोजेबाग येथे नमाज अदा केल्यानंतर खुदब्यात सामाजिक प्रश्नांचा उहापोह करण्यात आला. यात प्रामुख्याने केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. या संकटाच्या प्रसंगी आपण सर्वजण केरळमधील बांधवांच्या सोबत आहोत. हे संकट लवकर दूर होऊन लवकरच तेथील जनजीवन सामान्य होईल, अशी कामना यावेळी करण्यात आली. तर शहरातील कचरा, पाणीप्रश्न आणि रस्त्याच्या समस्येसाठी मुस्लिम बांधवांनी पाठपुरावा करण्याचा संकल्प करण्यात आला. ट्रिपल तलाकच्या माध्यमातून शरीयतशी छेडछाड करण्यास विरोध करण्याचे आवाहनही यावेळी केले.

ईद-उल-जुहाचे महत्व
बकरी ईद म्हणजेच ‘ईद उल अज्हा’ मुस्लिम समाजात इस्लामी कालगणनेच्या शेवटच्या ‘जिलहिज्जा’च्या १० तारखेला त्याग व बलिदानाची शिकवण देणारा सण आहे. या दिवशी बकऱ्याची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. हजरत इब्राहिम अलैहीस्लाम व त्यांचे पुत्र हजरत इस्माईल अलैहीस्लाम यांच्या त्याग व बलिदानाच्या स्मृतीप्रीत्यर्थ बकरी ईद सण साजरा करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close