Visit Our Website
Breaking News

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण : तपास यंत्रणेला सापडली हत्यारे.

काल रात्री पासून सीबीआय आणि दहशतवाद  विरोधी पथकाने अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी कारवाई केली. पहाटेच्या सुमारास आरोपी सचिन अंदुरेचा चुलत भाऊ अाणि मित्रांच्या घरी तपास यंत्रणांनी छापा टाकला. या तपासात पिस्तूल सापडले असून या पिस्तूलनेच दाभोळकरांची हत्या केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. तपास यंत्रणांनी या प्रकरणी रोहित रेगे, नचिकेत इंगळे, अजिंक्य सुरले या तिघांना ताब्यात घेतले आहे. तसेच तपास यंत्रणेच्या छाप्यात कट्यार, तलवार, आणि पिस्तूल सापडले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close