Visit Our Website
Today's Special

२४ ऑगस्ट – क्रांतिकारक राजगुरू यांची आज जयंती.

२४ ऑगस्ट २०१८ दिनविशेष

वार : शुक्रवार (शुभ दिवस)  

 शके : १९४०

 सुर्योदय : ०६.२१

 सुर्यास्त : १९.००

 नक्षत्र : उत्तराषाढा

 तिथी : शु. त्रयोदशी

२४ ऑगस्ट दिनविशेष

१९०८ : क्रांतिकारक शिवराम हरी ‘राजगुरू’ यांची आज जयंती(मृत्यू: २३ मार्च १९३१)

भारतीय स्वातंत्र्य लढा म्हणजे सर्वोत्तम क्रांतीलढ्यापैकी एक. कित्येक क्रांतीकारक स्वातंत्र्यासाठी हसत हसत मृत्युला सामोरे गेले. क्रांतिकारकांची आठवण होताच भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या त्रिकुटाची आठवण होते. राजगुरू यांची आज जयंती. त्यांचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू (ऑगस्ट २४,  इ.स. १९०८ खेड, महाराष्ट्र – मार्च २३, इ.स. १९३१ )लाहोर पंजाब हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते. राजगुरूंचा जन्म पुण्या़जवळ खेड येथे ऑगस्ट २४,  इ.स. १९०८ रोजी एका मराठीभाषक, देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना ‘रघुनाथ’ या नावानेही ओळखले जात असे.. राजगुरू यांना अचूक नेमबाजी आणि दांडगी स्मरणशक्तीची जणू दैवी देणगीच लाभली होती. कोणत्याही मोहिमेसाठी ते एका पायावर तयार असत. स्वातंत्र्यप्राप्ती वगळता कोणतीही अभिलाषा मनात न धरता केवळ देशासाठी प्राणांची आहुती देणा-या तसचे महाराष्ट्राचे नाव क्रांतीपर्वात अढळ करणा-या राजुगुरूंसारखे क्रांतिकारक तरूणांसाठी आदर्श बनले आहेत.

१८८० : कवयित्री बहिणाबाई चौधरी याची आज जयंती(मृत्यू: ३ डिसेंबर १९५१)

 त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम करता करता त्या उत्स्फुर्तपणे ओव्या रचून गात असत. बहीणाबाई चौधरी यांचा जन्म नागपंचमीच्या दिवशी असोड (जळगाव) गावात झाला. लिहिता न येणाऱ्या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत. महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान साध्या, सोप्या, आणि कमी शब्दांत सहजपणे त्यांनी  आपल्या कवितांमधून दर्शवले आहे.

२४ ऑगस्ट – इतर काही दिनविशेष.

१६०८ : ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे दाखल १९४७ : पॉलो कोहेलो – ब्राझिलियन लेखक
१९४४ : संयुक्ता पाणिग्रही – ओडीसी नर्तिका (मृत्यू: २४ जून १९९७)
१९३२ : रावसाहेब गणपराव जाधव – मराठीतील व्यासंगी साहित्यसमीक्षक. ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा’चे तिसरे अध्यक्ष व ‘मराठी विश्वकोशा’चे प्रमुख संपादक (२००१ – २००३).
१९२९ : यासर अराफत – नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४)
१९१८ : सिकंदर बख्त – केन्द्रीय परराष्ट्रमंत्री, केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)
१९१७ : पं. बसवराज राजगुरू – किराणा घराण्याचे गायक (मृत्यू: ? ? १९९१)
१८८८ : बाळ गंगाधर तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्‍चायुक्त (मृत्यू: ८ मार्च १९५७)
१८७२ : साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा ’तात्यासाहेब’ केळकर – लोकमान्य टिळक तुरुंगात असल्यामुळे त्यांनी १८९७ पासून ‘केसरी‘ व ‘मराठा‘चे संपादन केले. कायदेमंडळाचे सभासद, दहा नाटके, आठ कादंबर्‍या, दोन कवितासंग्रह, दोन कथासंग्रह, आठ चरित्रात्मक ग्रंथ आणि विवेचनात्मक ग्रंथ इ. त्यांची साहित्यसंपदा आहे. (मृत्यू: १४ आक्टोबर १९४७)
१८३३ : नर्मदाशंकर दवे ऊर्फ ’नर्मद’ – गुजराथी लेखक व समाजसुधारक, त्यांनी गुजराथी भाषेचा शब्दकोश सर्वप्रथम तयार केला. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६)
२००० : कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्‍या ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू (जन्म: ३० जून १९२८)
१९९३ : शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर – प्रथमश्रेणीचे ६२ सामने, १०० डाव, ११ वेळा नाबाद, ९ शतके, ३९५१ एकूण धावा, ४४.३९ सरासरी. भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. (जन्म: १४ जानेवारी १८९२)
१९२५ : सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक (जन्म: ६ जुलै १८३७)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close