Visit Our Website
Breaking News

शहरात आयकर विभागाचे मंगळवारपासून धाडसत्र सुरु

मंगळवारपासून शहरात आयकर विभागाचे धाडसत्र सुरू आहे. चार उद्योग समुहांचे कर चूकवेगिरी प्रकरण आणि बेहिशोबी मालमत्ता याबाबत हे धाड सत्र सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील २ बिल्डर्स, एक ऑइल मिल, एक मोठा उद्योग समूह यांच्यावर मंगळवारी सकाळी एकाच वेळी आयकर विभागाने धाड टाकली. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या चारही उद्योग समूहांच्या संबंधित देशभरात ८० ठिकाणीसुद्धा धाड टाकण्यात आल्याची माहिती आहे. यात मुंबई, पुणे, सुरत, हैद्राबाद, जयपूर इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे. आयकर विभागाच्या या धाडसत्रात २५० कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. देशभरातील ही तपासणी आणखी दोन दिवस सुरू राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close