Breaking News

दौलताबाद किल्ल्यासमोर विहिरीत कार पडली

रात्री 2 वाजेची घटना,  दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त

दौलताबाद किल्ल्या समोरील पोलीस चौकी शेजारील बारव ( विहिर ) मध्ये कार क्र.एम एच 20 इ. एफ. 0707 पडल्याची घटना 31 डिसेबंर च्या राञी 2 वाजेच्या सुमारास घडली असुन कारमध्ये एकूण पाच लोक आहेत त्या पैकी 3 लोक सुखरुप आसुन 2 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. कारमधील व्यक्ती औरंगाबाद शहरातील असल्याचे समजते आहे.
दौलताबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक राजश्री आढे यांनी माहिती मिळताच घटनास्थळाकडे त्यांनी धाव घेतली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या साह्याने या मुलांना काढण्यात आले

Related Articles

Close