Breaking News

मुंबई गुन्हे शाखा आणि गुजरात एटीएसची कारवाई.

शहरातील सिग्मा हॉस्पीटल परिसरातून केली आराेपीला अटक.

शहरातील सिग्मा हाॅस्पिटल परिसरातून दुपारी ३ वा. गुजराथ ए.टी.एस.आणि मुंबई गुन्हेशाखेने १६ वर्षापूर्वी घाटकोपर येथे बसमधे स्फोट झालेल्या आणि १२ वर्षांपूर्वी अहमदाबादजवळ झालेल्या रेल्वेस्फोट प्रकरणातील आरोपीला अटक केली. बुधवारी कोर्टात हजर करुन पुढील तपासाकरता त्याला गुजराथला नेण्यात आले. घाटकोपर बाॅम्बस्फोटात २ ठार आणि ५० लोक जखमी झाले होते. रेल्वेस्फोटात शेकडो नागरिक जखमी झाले होते. मुंबई गुन्हेशाखा आणि गुजराथ एटीएसने संयुक्त कारवाई पार पाडली. रविवारी तो सौदीअरबहून शहरात त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आला होता. अशी माहिती गुजराथ एटीएस च्या वरिष्ठ सुत्रांनी दिली. याह्याखान अब्दुल रहेमान शेख.(४३) रा.कैसर काॅलनी मिनार मस्जीद जिन्सी (साॅफ्टवेअर इंजिनिअर) असे आरोपीचे नाव असून शहरातील सिग्मा हाॅस्पिटल परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे .हा जगातल्या कोणकोणत्या दहशतवादी संघटनांसाठी काम करतो याबाबत लवकरच माहिती उजेडात येईल असे सुत्रांकडून कळाले.

२००६ साली अहमदाबाद परिसरातील कालूपूर रेल्वेस्टेशन जवळ रेल्वेत बाॅम्बस्फोट झाला होता.त्यात शेकडो नागरिक  जखमी झाले होते. यातील प्रमुख फरार आरोपीला याह्याखान ने बाँब तयार करण्यासाठी मदत केल्याची माहिती गुजराथ एटीएस ला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

१६ वर्षापूर्वी २००२ साली याह्याखान आणि त्याचा जोडीदार इरफान अहमद कुरेशी यांनी घाटकोपर मधे बेस्ट च्या बसमधे बाॅंबस्फोट घडवून आणला होता. गुन्हा घडण्याच्या ४ ते ५ महिने आधि याह्याखान सौदीअरेबियात निघून गेला होता. इरफान कुरेशी ला तीन महिन्यांपूर्वीच शहरातून उस्मानपुरा परिसरातून अटक करण्यात आली होती.गेल्या एक वर्षापासून गुजराथ एटीएस पथक याह्याखानवर लक्ष ठेऊन होते. मंगळवारी दुपारी एक वाजता तो त्याच्या पत्नीला शहानूर मिया दर्गा परिसरातील युनाईटेड सिग्मा हाॅस्पिटल मधे घेऊन आला होता. किरकोळ उपचारा नंतर त्याच्या पत्नीने हाॅस्पिटल जवळच्या मेडिकल मधून औषधी खरेदी केले. गुजराथ पोलिसांनी हाॅस्पिटल परिसरातील सी.सी.टि.व्ही.फुटेज तपासले. त्याच्या पत्नीने खरेदी केलेल्या औषधांची प्रिस्कीप्शन जप्त केली. मंगळवारी दुपारी ३ वा याह्याखानला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि आरोपीची शहानिशा झाल्यावर त्याला गुजराथला नेण्यात आले. याह्याखान हा साॅफ्टवेअर इंजिनिअर असून विविध दहशतवादी संघटनांसाठी तो काम करतो. अशी माहिती गुजराथ पोलिसांना मिळाली.या कारवाईत मुंबई गुन्हेशाखेचे पोलिसउपायुक्त दिलीप सावंत, एटीएस गुजराथ चे पोलिस निरीक्षक निखीलकुमार ब्रम्हभट,पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांनी सहभाग घेतला होता.

Related Articles

Close