Breaking News
औरंगाबाद उपमहापौर पदावर शिवसेनेचे जंजाळ
औरंगाबाद महानगरपालिका उपमहापौर पदावर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ हे विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 51 मते पडली. त्यांच्याविरोधात भाजप पुरस्कृत उमेदवाराला 32 मते मिळाली. निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची मते फुटली.
शिवसेना-भाजप युती फिस्कटल्यानंतर भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले. त्यासाठी मंगळवारी निवडणूक झाली. महाविकास आघाडीत उपमहापौर पद काँग्रेसला जाणार का अशी चर्चा होती. मात्र, शिवसेनेने राजेंद्र जंजाळ यांना उमेदवारी दिली. आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे जंजाळ, काँग्रेसकडून अफसर खान, भाजप पुरस्कृत गोकुळ मलके, एमआयएमकडून जफर बिल्डर असे उमेदवार होते. यात काँग्रेस, राष्ट्रवादी च्या नगरसेवकांनी जंजाळ यांना मतदान केले. जंजाळ यांना 51 मते पडली. भाजप पुरस्कृत मलके यांना 34 तर एमआयएम चे जफर यांना 13 मते मिळाली. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मते फुटल्याची चर्चा आहे.