Visit Our Website
In ShortUncategorized

ऑक्टोबरमध्ये बहुभाषीक बालसाहित्याचा पुस्तक मेळा

राष्ट्रीय उर्दू भाषा परिषदेतर्फे आयोजन, रिड अॅण्ड लिड फाऊंडेशनचे सहकार्य

वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात राज्यातील सर्वच प्रमुख शहरात खास लहान मुलांच्या पुस्तकाचे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय उर्दू भाषा परिषद पुढाकार घेणार असून सर्व भाषातील पुस्तकांचा मेळा लागणार आहे. औरंगाबादमध्ये रिड अॅण्ड लिड फाऊंडेशनच्यावतीने पुस्तक मेळ्याचे आयोजन केले जाईल.

लहान मुलांमध्ये पुस्तकांची आवड कशी लावता येणार याबाबत शनिवारी दिल्लीत राष्ट्रीय उर्दू भाषा परिषदेच्यावतीने पुस्तक विक्रेते आणि प्रकाशकांची बैठक झाली. यात औरंगाबादेतील मिर्झा बुक वर्ल्डचे संस्थापक आणि रिड अॅण्ड लिड फाऊंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांची उपस्थिती होती. बैठकीला राष्ट्रीय उर्दू भाषा परिषदचे संचालक प्रा.इरतेजा करीम यांनी पुस्तकांबाबत प्रेम वाढवण्यासंबधी सूचना मागवल्या. त्यात नदवी यांनी ठिकठिकाणी खास लहान मुलांच्या पुस्तकांचा मेळा आयोजित करण्याची सूचना केली. मोठ्यांच्या पुस्तकाचे मेळे, प्रदर्शन सगळीकडे लागतात. मात्र, लहान मुलांच्या पुस्तकाचा मेळा लावला तर तो मुलांना अापलासा वाटेल. ते मोठ्या संख्येने यात भेट देतील, अशी सूचना त्यांनी केली. प्रा.करीम यांना ती पटली. त्यांनी वाचन संस्कृतीला वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच शहरात ऑक्टोबर महिन्यात खास बहुभाषी चिल्ड्रन बुक फेस्टिवल आयोजित करण्याचा कार्यक्रम तयार केला आहे.

मिर्झा नदवी म्हणाले, राष्ट्रीय उर्दू भाषा परिषदतर्फे प्रकाशित पुस्तकांचा दर्जा उत्तम आहे. मात्र, ती सर्वत्र मिळत नाही. यामुळे या पुस्तकांच्या विक्रीचे काऊंटर सुरू करणे तसेच सर्व पुस्तकांच्या दुकानात अत्यल्प दरातील ही पुस्तके उपलब्ध करून देण्याची सूचनाही मान्य करण्यात आली. तर महापुरूष, शास्त्रज्ञ, खेळाडू, कलाकार यांच्या जन्मदिनी त्यांच्यावरील पुस्तकांचे सामूहिक वाचन करावे. लेखक आपल्या भेटीला सारखे उपक्रम आयोजित करावेत. तसेच उर्दू परिषदेच्या पुस्तकांचे वर्गणीदार वाढवावेत यासाठी खास कॅम्प आयोजित करण्याची मागणी त्यांनी केली. बैठकीला रिसर्च ऑफीसर शाह नवाज खुर्रम, दिल्लीतील प्रकाशक अब्दुस्समद यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close