Visit Our Website
Happenings

औरंगाबाद फक्त महाराष्ट्राची नव्हे तर दक्षिण आशियाची पर्यटन राजधानी

औरंगाबाद टुरिसम आणि ट्रॅव्ह्ल्स आसोसिएशनचा ७ वा वर्धापन दिन साजरा

पर्यटनाच्या क्षेत्रात औरंगाबादचे महत्व अनन्यसाधारण आहे. या शहराला राज्याच्या पर्यटन राजधानीचा दर्जा मिळाला आहे. मात्र, हे शहर फक्त एका राज्याची नव्हे दक्षिण आशियाची पर्यटन राजधानी असल्याचे गौरवोदगार विद्यापीठातील पर्यटन प्रशासन विभागाचे संचालक प्रा.डॉ.राजेश रगडे यांनी काढले. खुलताबाद ही संपूर्ण जगातील सूफी परंपरेची राजधानी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

पर्यटन आणि ट्रॅव्हल्स व्यावसायीक संघटना औरंगाबाद टुरिझम अॅण्ड ट्रॅव्हल्स आसोसिएशनचा ७ वा वर्धापन आज साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.रगडे बाेलत होते. हॉटेल व्हिट्समध्ये झालेल्या कार्यक्रमाला सहायक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते, एसीपी डी.एन.मुंढे, आरटीओ निरीक्षक रवींद्र यादव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पर्यटन प्रशासन विभागाचे संचालक प्रा.रगडे, संघटनेचे अधक्ष अमेर हुसेनी, उपाधक्ष प्रवीण डेरे, सचिव अनिल कहाळे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

श्रीकृष्ण नखाते यांनी औरंगाबाद मध्ये कुल कॅब, रेंट अ मोटारसायकल यासारख्या सोयी पर्यटकांना उपलब्ध करून देण्यासाठी संघटनेने पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. यादव यांनी पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांचे फिटनेस, इन्शुरन्स अप टू डेट असावे असे सांगितले.

अध्यक्षीय समारोप करताना डॉ.राजेश रगडे यांनी औरंगाबाद हे महाराष्ट्राची नव्हे तर दक्षिण आशियाची पर्यटन राजधानी असल्याचे सांगीतले. ते म्हणाले खुलताबाद हे संपूर्ण जगाची सूफी परंपरेची राजधानी आहे. एवढ्या महत्वाच्या शहरात आपण राहतो याचा अभिमान वाटायला हवा. या शहराच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी पर्यटनाशी उद्योग, संस्था, संघटना आणि शासकीय विभाग, महामंडळ अशा सर्वच भागधारकांनी एकत्र येण्याचे आव्हान त्यांनी केले. या प्रसंगी उत्कृष्ट कार्य केलेल्या ३५ वाहन चालकांना प्रमाण पत्र देऊन पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यटनाशी संबंधित टूरिस्ट गाईड, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर, हॉटेल व्यावसायीक, बँक, इंन्शुरेन्स कंपनी आदीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close