Visit Our Website
Today's Special

२५ ऑगस्ट- आज नारळी पौर्णिमा

२५ आॅगस्ट २०१८ दिनविशेष

वार : शनिवार (शुभ दिवस दुपारी ३.१५ पर्यंत, पौर्णिमा प्रारंभ दुपारी ३.१५)

शके : १९४०

सुर्योदय : ०६.२२

सुर्यास्त : १८.५९

नक्षत्र : श्रवण

तिथी : शु. चतुर्दशी

२५ ऑगस्ट दिनविशेष

आज नारळी पौर्णिमा

पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. नागपंचमी नंतर श्रावणात येणारा हा दुसरा सण आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्‍तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. `सागरे सर्व तीर्थानि’ असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करतांना वरुणदेव प्रसन्न असल्यास तो साहाय्य करतो.

नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण का करावा ?

नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असल्याने व नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व यमलहरींना ताब्यात ठेवत असल्याने जलावर ताबा मिळवणार्‍या सागररूपी वरुणदेवतेला नारळ अर्पण करतात. या दिवशी ब्रह्मांडात आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असते. या लहरी ब्रह्मांडात भोवर्‍याप्रमाणे गतिमान असतात. वरूणदेवता ही जलावर ताबा मिळवणारी व त्याचे संयमन करणारी असल्याने या दिवशी सागररूपी वरुणदेवतेला आवाहन करून तिला नारळ अर्पण करून ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या यमलहरींना ताब्यात ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. नारळातील पाण्यात तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. नारळातील पाणी हे आपतत्त्वाचे प्रमाण जास्त असणार्‍या यमलहरी ग्रहण करण्यात अतिशय संवेदनशील असते. वरुणदेवतेला आवाहन करतांना तिच्या कृपाशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात. नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व या यमलहरींना ताब्यात ठेवून त्यांतील रज-तम कणांचे विघटन करून त्यांना सागरात विलीन करते; म्हणून या दिवशी वायुमंडलातील यमलहरींचे नारळाच्या माध्यमातून उच्चाटन करून सागररूपी वरुणदेवतेच्या चरणी त्यांचे समर्पण करण्याला महत्त्व आहे. यामुळे वायुमंडलाची शुद्धी होते. यमलहरींच्या वातावरणातील अधिक्यामुळे शरीरात अधोगामी वहाणारे वायु कार्यरत् झाल्याने पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक लहरी पटकन जिवाच्या तळपायाकडे आकृष्ट झाल्याने त्याला त्रास होण्याची शक्यता जास्त असते.

२५ ऑगस्ट – इतर काही दिनविशेष

२००१ : सरोदवादक अमजद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर
१९९८ : एनसायकक्लोपिडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या संपादकीय आवृत्तीच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली. या आवृत्तीतील भारताच्या सीमा चुकीच्या दाखवल्यामुळे तसेच जम्मू काश्मीर राज्याविषयी चुकीची माहिती दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
१९९७ : दक्षिण कन्नडा (South Canara) जिल्ह्याचे विभाजन करुन ’उडुपी’ हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला.
१९९१ : लिनस ट्रोव्हाल्डस याने ’लिनक्स’ (Linux) या संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रकाशित केली.
१९९१ : एअरबस ए-३२० ने पहिले उड्डाण केले.
१६०९ : गॅलेलिओ गॅलिली याने जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.

जन्म
१९६२ : डॉ. तस्लिमा नसरीन – बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका
१९४१ : अशोक पत्‍की – संगीतकार
१९३० : शॉन कॉनरी – ’जेम्स बॉन्ड’च्या भूमिकांमुळे गाजलेला स्कॉटिश अभिनेता व निर्माता
१९२३ : गंगाधर गाडगीळ – साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ञ, ५६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: १५ सप्टेंबर २००८)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close