Today's Special

१६ ऑगस्ट- कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा आज स्मृतिदिन

१६ ऑगस्ट २०१९ दिनविशेष

वार : शुक्रवार

सुर्योदय : ०६.२०

सुर्यास्त : १९.०६

नक्षत्र : धनिष्ठा

तिथी : कृ. प्रतिपदा

कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा आज स्मृतिदिन

नारायण गंगाराम सुर्वे (ऑक्टोबर १५ , इ.स. १९२६ – ऑगस्ट १६ , इ.स. २०१०) साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना इ.स. १९९८चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. नारायण सुर्वे यांच्या वरती मार्क्सवादी विचाराचा पगडा होता ,आपलया लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तनाचे कवणे लिहिली … इ.स. १९६२ साली त्यांनी लिहिलेल्या कवितांचा पहिला संग्रह – “ऐसा गा मी ब्रह्म” – प्रकाशित झाला. नारायण सुर्वे हे परभणी येथे इ.स. १९९५मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
तळागाळातील साहित्यिक व कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुणे शहरात सुर्व्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ’नारायण सुर्वे कला अकादमी’ स्थापन करण्यात आली आहे. नारायण सुर्व्यांच्या पत्‍नी कृष्णाबाई या अकादमीच्या सध्याच्या(२०१२) कार्यकारी विश्वस्त आहेत.

१६ ऑगस्ट – इतर दिनविशेष

२०१० : जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.
१९९४ : बांगलादेशातील वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडीश पेन क्लबतर्फे ’कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार’ जाहीर
१९६० : सायप्रसला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९४६ : कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.
१९१३ : स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.
१९७० : मनीषा कोईराला – नेपाळी-भारतीय अभिनेत्री
१९७० : सैफ अली खान – अभिनेता
१९५८ : मॅडोना – अमेरिकन गायिका, गीतलेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, नर्तिका आणि उद्योजिका
१९५४ : हेमलता – पार्श्वगायिका
१९५२ : कीर्ती शिलेदार – गायिका व अभिनेत्री
१९५० : जेफ थॉमसन – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज
१९१३ : मेनाकेम बेगीन – इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिकविजेते (मृत्यू: ९ मार्च १९९२)
१९०४ : सुभद्राकुमारी चौहान – हिन्दी कवयित्री (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९४८)
१८७९ : जगन्नाथ रघुनाथ आजगावकर – संतचरित्रकार, १९०७ ते १९३५ या काळात त्यांच्या ’महाराष्ट्र कविचरित्र’ या ग्रंथाचे नऊ खंड प्रकाशित झाले होते. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९५५)
२०१० : नारायण गंगाराम सुर्वे – कवी (जन्म: १५ आक्टोबर १९२६)
२००३ : इदी अमीन – युगांडाचा हुकुमशहा (जन्म: १९२० च्या आसपास)
२००० : रेणू सलुजा – ’परिंदा’, ’धारावी, ’सरदार’ आणि ’गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक (जन्म: ५ जुलै १९५२ – नवी दिल्ली)
१९९७ : अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर यांचे निधन (जन्म: ? ? ???? – पेडणे, गोवा)
१९९७ : नुसरत फतेह अली खान – कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी सूफी गायक (जन्म: १३ आक्टोबर १९४८)
१९७७ : एल्व्हिस प्रिस्टले – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि ’किंग ऑफ द रॉक अँड रोल’ (जन्म: ८ जानेवारी १९३५)
१८८६ : स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांनी समाधी घेतली. (जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ – कार्मापुकुर, हुगळी, पश्चिम बंगाल))
१७०५ : जेकब बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म: २७ डिसेंबर १६५४)

Related Articles

Close