Visit Our Website
Today's Special

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज जन्मदिवस.

२८ सप्टेंबर २०१८ दिनविशेष

वार : शुक्रवार (संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय ०८.५७)

शके : १९४०

सुर्योदय : ०६.२८

सुर्यास्त : १८.३०

नक्षत्र : भरणी

तिथी : कृ. तृतीया

२८ सप्टेंबर दिनविशेष

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज जन्मदिवस

आपल्या स्वरलाहरींनी सगळ्यांना खिळवून ठेवणाऱ्या  लता मंगेशकर यांचा आज जन्मदिवस. हिंदी संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.
भारताचा सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्‍न’ प्राप्त करणाऱ्या गायन क्षेत्रातील व्यक्तींमध्ये मंगेशकर या दुसऱ्या आहेत. लता मंगेशकर हे नाव ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये इ.स. १९७४ ते इ.स. १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नमूद झालेले आहे.

२८ सप्टेंबर – इतर दिनविशेष

२००० : विख्यात नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांना ’विष्णूदास भावे गौरव पुरस्कार’ जाहीर
१९९९ : महाराष्ट्र सरकारचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर
१९६० : माली आणि सेनेगलचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश
१९५० : इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश
१९३९ : दुसरे महायुद्ध – वॉर्सॉने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९२८ : सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना आपल्या प्रयोगशाळेत एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली. यातुनच पुढे ’पेनिसिलीन’ या प्रतिजैविकाचा शोध लागला.
१९८२ : अभिनव बिंद्रा – ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय
१९८२ : रणबीर कपूर – अभिनेता
१९४७ : शेख हसीना – बांगलादेशच्या १० व्या पंतप्रधान
१९४६ : माजिद खान – पाकिस्तानी क्रिकेट कप्तान
१९०९ : पी. जयराज – मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते (मृत्यू: ११ ऑगस्ट २०००)
१९०७ : भगत सिंग – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१)
१८९८ : शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते – स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार, हिंदू महसभेचे अध्यक्ष, देवनागरी लिपी बसवणारे म्हणून त्यांनी लौकिक मिळवला
१८०३ : प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ (मृत्यू: २३ सप्टेंबर १८७०)
२०१२ : ब्रजेश मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (जन्म: २९ सप्टेंबर १९२८)
२०१२ : माधव एस. शिंदे – प्रख्यात चित्रपट संकलक (शोले, सीता और गीता, शान, रझिया सुलतान, सोहनी महिवाल, सागर, चमत्कार), फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट संकलक पारितोषिक विजेते (शोले – १९७५) (जन्म: ?? ???? १९२९)
२००४ : डॉ. मुल्कराज आनंद – लेखक (जन्म: १२ डिसेंबर १९०५)
२००० : श्रीधरपंत दाते – सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते
१९९२ : मेजर ग. स. ठोसर – पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे
१९८९ : फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ११ सप्टेंबर १९१७)
१९५६ : विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक (जन्म: १ आक्टोबर १८८१)
१९५३ : एडविन हबल – अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (जन्म: २० नोव्हेंबर १८८९)
१८९५ : लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म: २७ डिसेंबर १८२२)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close