Visit Our Website
Today's Special

१ ऑक्टोबर- भारताचे पहिले पोस्टाचे तिकीट छापले.

१ ऑक्टोबर २०१८ दिनविशेष

वार : सोमवार (सप्तमी श्राध्द, शुभ दिवस सायं. ५.४० नं)

शके : १९४०

सुर्योदय : ०६.२९

सुर्यास्त : १८.२७

नक्षत्र : मृगयशीर्ष

तिथी : कृ. सप्तमी

१ ऑक्टोबर दिनविशेष

१ ऑक्टोबर- भारताचे पहिले पोस्टाचे तिकीट छापले.

सध्याच्या टपालव्यवस्थेची सुरवात सतराव्या शतकात इस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाली. १६८८मध्ये मुंबई आणि मद्रास इथे कंपनी पोस्टची कार्यालये स्थापन झाली. मात्र त्याद्वारे केवळ कंपनीच्या टपालाचीच ने-आण होई. वॉर्न हेस्टिंग्ज बंगाल प्रांताचा गव्हर्नर असताना आणि मुंबई आणि मद्रास प्रांताचे देखरेखीचे अधिकार त्यांच्याकडे असताना सन १७७४ मध्ये टपालसेवा जनतेसाठी खुली करण्यात आली. पोस्टमास्टर जनरलची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आणि टपालसेवेसाठी पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकन टपालासोबत वापरायला सुरूवात झाली. सुरवातीच्या काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सर्व प्रेसिडेन्सींअंतर्गतची टपाल सेवा एकसूत्री असावी असा विचार पुढे आला. त्यातूनच पहिला भारतीय टपाल कायदा, १८३७ हा अस्तित्वात आला. त्यात पुढे बदल करून १८५४चा टपाल कायदा अस्तित्वात आला, त्याद्वारे देशात टपाल सेवेचा एकाधिकार हा टपाल खात्याला देण्यात आला. २०११ पर्यंत त्यात बदल झालेला नाही. पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकन मागे पडून, १ ऑक्टोबर १८५४ पासून चिकट पार्श्वभाग असलेली टपाल तिकीटे अस्तित्वात आली.

१ ऑक्टोबर- आजपासून वन्यजीव सप्ताह सुरू

पृथ्वीवर प्रचंड जैवविविधता आहे. परंतु जंगलतोड, वाढते शहरीकरण, पशुपक्ष्यांच्या अधिवासांवर मानवी आक्रमण यांसारख्या बाबींमुळे हल्ली माणसाचा जंगली प्राण्यांशी संबधच येत नाही आणि येतो तेव्हा दोन्ही बाजूंना फारसा आनंददायक नसतो ! ही परस्थिती बदलण्यासाठीचे या सप्ताहाच्या निमित्ताने होत आहेत.
भारतात १९५२ वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. नामशेष होत चाललेल्या वन्य पशुपक्ष्यांबाबत जागृती निर्माण करणे हा त्यामागील हेतू आहे. आता या मूळ हेतूचा काळानुसार विस्तार झाला आहे. वन्यजीवांनी मानवी आयुष्यात प्रवेश करण्यामागची कारणे समजावून दिली जात आहेत.

१ ऑक्टोबर -इतर दिनविशेष

२००५ : इंडोनेशियातील बाली बेटांवर बॉम्बस्फोटांत १९ जण ठार झाले.
१९६० : नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९५९ : भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९५८ : भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.
१९४६ : युनायटेड किंग्डममधे ’मेन्सा इंटरनॅशनल’ या संस्थेची ची स्थापना झाली.
१९४३ : दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरावर ताबा मिळवला.
१८९१ : स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना
१८८० : थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला.
१७९१ : फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू

१९३० : जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (३१ मे १९९६ – ७ आक्टोबर १९९९) (मृत्यू: १२ डिसेंबर २०००)
१९२८ : विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते (मृत्यू: २१ जुलै २००१)
१९२४ : जिमी कार्टर – अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते
१९१९ : गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (मृत्यू: १४ डिसेंबर १९७७)
१९१९ : मजरुह सुलतानपुरी – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९९३) शायर, गीतकार आणि कवी (मृत्यू: २४ मे २०००)
१९०६ : सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक (मृत्यू: ३१ आक्टोबर १९७५)
१८९५ : लियाकत अली खान – पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: १६ आक्टोबर १९५१)
१८८१ : विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५६)
१८४७ : अ‍ॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले होते. त्यांनी भगवद्‌गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले होते. त्यांची ग्रंथसंख्या सुमारे ४५० इतकी आहे. १९१६ मध्ये त्यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली. (मृत्यू: २० सप्टेंबर १९३३)

१९९७ : गुल मोहम्मद – जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१”) (जन्म: ?? १९६१)
१९३१ : शंकर काशिनाथ गर्गे तथा ’दिवाकर’ – नाट्यछटाकार (जन्म: १८ जानेवारी १८८९)
१८६८ : मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) – थायलंडचा राजा (जन्म: १८ आक्टोबर १८०४)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close