Visit Our Website
Special Story

कसा असेल होणारा जोडीदार ?, बिझीनेस पार्टनर फायद्याचा ठरेल ना? हस्ताक्षर तज्ञ प्रांजल देईन सर्व प्रश्नांची उत्तरे

आपला होणारा जोडीदार कसा असेल? नोकरी करू की बिझीनेस? बिझीनेस पार्टनर मध्येच दगाफटका तर नाही ना करणार? नविन एम्प्लाई प्रामाणिक असेल ना? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरे आता तुम्हाला कल्याणच्या हस्ताक्षर तज्ञ म्हणजेच ग्राफोलॉजीस्ट प्रांजल गंध्रे यांच्याकडून मिळू शकतील. ग्राफोलॉजीत हस्ताक्षरावरून स्वभाव वैशिष्ट ओळखली जातात. माणसाचा भूतकाळ आणि भविष्यही सांगता येतो. तर करतांय ना प्रांजल यांना मेल.

ग्राफोलॉजी ही विद्या जर्मनीहून आपल्याकडे आली. प्राचीन काळात ग्राफोलॉजीचा राजदरबारात उपयोग केला जायचा. या विद्येवर पहिले पुस्तक इ. स. १६२२ मध्ये कॅमीलो बॅल्डो या लेखकाने प्रकाशित केले. मिल्टन बंकर याने इ.स.१९१५ मध्ये हस्ताक्षर विश्लेषणास सुरुवात केली होती. यावर पहिलं संशोधन १९२९ मध्ये झाले. ४५०० वर्षापूर्वीचा इतिहास असलेल्या या कलेला भारतात आता सुगीचे दिवस आलेे आहेत. हस्ताक्षराचा विश्लेषणात्मक, शास्त्रोक्त अभ्यास म्हणजेच ग्राफोलॉजी. प्रांजल गंध्रे यांनी या कलेत प्राविण्य मिळवले आहे.

प्रांजल यांनी तपासले हजारावर हस्ताक्षरे
मॅकेनिकल इंजिनिअर असणाऱ्या प्रांजल गंध्रे ३ वर्षांपासून ग्राफोलॉजीस्ट म्हणून काम करतायत. सद्या त्या इंजिनिअरींगचे पुढील शिक्षण घेत आहेत. सुरूवातीला छंद म्हणून ग्राफोलॉजीकडे बघीतले. नातेवाईक, मित्रांच्या हस्ताक्षराचे विश्लेषण केले. अनेक जणांना प्रांजल सांगत असलेले तंतोतंत खरे असल्याचा अनुभव आला. तर त्यांनी सुचवलेल्या बदलामुळे अनेक जणांना फायदा झाला. तीन वर्षात त्यांनी १ हजाराहून अधिक लोकांच्या हस्ताक्षराचे विश्लेषण केले आहे. यात काही सेलिब्रिटीच्या अक्षरांचाही समावेश आहे.

ग्राफोलॉजीतून मिळवा उत्तरे
प्रांजल यांच्या मते, ग्राफोलॉजी हे ज्योतीष शास्त्र नाही. पण या शास्त्रातून भूतकाळासोबतच वर्तमान आणि भविष्याचीही माहिती मिळू शकते. भावी वधू-वर कसा असेल, पार्टनरशीपच्या व्यवसायात भागीदार साथ देईल ना, नोकरीसाठी नविन माणूस प्रामाणिकपणे काम करेल, आरोग्याच्या काेणत्या तक्रारी बळावतीतल, नोकरी बदलणे योग्य ठरेल का, नोकरी करू की व्यवसाय ?अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे ग्राफोलॉजीतून मिळवता येतात. याच्यासोबतच माणसाचा स्वभाव, त्याच्या सवयी, त्याच्या जमेच्या बाजू, कमतरता, आर्थिक स्थिती, गंुतवणूकीचे मार्ग, दगाबाजपणा याचीही माहिती मिळवता येते.

ग्राफोथेरपीत जाणून घ्या उपाय
प्रांजल यांच्या काऊन्सलिंग सेंटरमध्ये ग्राफोलॉजीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारावर स्वभावात बदल करण्यासाठी काही उपायही सांगीतले जातात. यालाच ग्राफोथेरपी असे म्हणतात. या थेरपीद्वारे कमकुवत बाबी दूर होतात. जमेच्या बाबी वाढतात. कमतरतांना दिशा देऊन त्यांना जमेच्या बाबींकडे वळवले जाते. यामुळे तणाव हलका होतो. आराेग्याच्या तक्रारीही दूर पळतात. साधारणपणे ३ महिने ही थेरपी चालत असल्याचे प्रांजल सांगतात.

चांगल्या करिअरची संधी
ग्राफॉलॉजी शिकण्यासाठी मोठ्या शैक्षणिक पात्रतेची गरज नाही. ग्राफोलॉजिस्ट होण्यासाठी संवादचातुर्य, विविध भाषांचे ज्ञान,भरपूर वाचन, लोकांना समजण्याचे, त्यांच्यात मिसळण्याचे गुण आवश्यक आहेत. ग्राफोलॉजी शिकवणारे शासकीय विद्यापीठ आणि संस्था देशात नसल्याने खासगी संस्थांना पर्याय नाही. त्याही मोजक्याच आहेत. याचा बेसीक कोर्स महिनाभरात पूर्ण होवू शकतो. तर काही अभ्यासक्रम वर्षभर चालणारे आहेत. अर्थात केवळ प्रमाणपत्र घेऊन भागणार नाही. तर हस्ताक्षर विश्लेषण हे अनुभवाअंती शिकण्याचे शास्त्र आहे. त्यांची संख्या कमी आहे. ग्राफोलॉजीस्ट मनोवैज्ञानिकाप्रमाणे काम करतात. म्हण्ून या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी आहेत.

-स्वत:चे काऊन्सेलिंग सेंटर सुरू करता येऊ शकते.
-सद्या काऊन्सेलिंग करणाऱ्या फर्ममध्ये नोकरी करता येते.
-फॉरेन्सिक लॅबमध्येसुद्धा हस्ताक्षर तज्ञांची गरज भासते.
-कॉर्पोरेट क्षेत्रात कर्मचारी नेमतांना त्याच्या हस्ताक्षराचे विश्लेषण केले जाते. येथे नोकरीची संधी आहे.

पाठवा तुमचे हस्ताक्षर
हस्ताक्षरावरून आपली माहिती जाणून घ्यायची असेल तर प्रांजल यांना ऑनलाईन संपर्क करता येऊ शकताे. यासाठी फक्त एकच करा. इंग्रजीत एक पानभर मजकूर न बघता लिहा. त्याखाली तीन सह्या करा. या पानाचे स्नॅप घेऊन 9923106566 या वाॅट्सअॅप क्रमांकावर पाठवा. ४८ तासात याचे सखोल विश्लेषन आपणास पाठवले जाईल.

जाणून घ्या स्वत:विषयी
ग्राफाेलॉजीद्वारे दुसऱ्यांविषयी माहिती जाणून घेतांनच आपल्यातील कमतरता जाणून त्यात सुधारणा करण्यास भरपूर वाव आहे. यातील निष्कर्षाचा आधार घेऊन भूतकाळाचा अभ्यास करत भविष्यातील धोके ओळखता येतात. त्यापासून सावध होता येता येते. भविष्यातील हाका ओळखण्याचे हे शास्त्र आहे.-प्रांजल गंध्रे, ग्राफाेलॉजीस्ट, कल्याण, मुंबई

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close