Visit Our Website
Happenings

स्टुडंट कार्ट डिझाईन चॅलेंज स्पर्धेत देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संघ देशात पहिला

सोसायटी ऑफ मेकॅनिकल ऍन्ड ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्टुडंट कार्ट डिझाईन चॅलेंज सिझन टू गोकार्ट स्पर्धेत देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करीत देशातून प्रथम क्रमांक पटकावला.
ही स्पर्धा 18 ते 21 सप्टेंबर दरम्यान हैदराबाद येथे घेण्यात आली. या स्पर्धेत देशभरातील68 संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेला व्हर्चुअल व डायनॅमिक इव्हेंटसमध्ये विभागण्यात आले होते. व्हर्च्युअल्समध्ये देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डायनॅमिक बुस्टर या संघाने गोकार्टची डिझाईन, ऍनेलेसिस, एसेम्ब्ली प्रझेंट केले व व्हर्च्युअल्समध्ये देखील प्रथम क्रमांक पटकावला. अंतिम फेरीत असेम्ब्ली व डिसेंम्ब्ली स्पर्धेत फक्त 9 मिनीटात या संघाने गोकार्टचे सर्व भाग डिसेंम्ब्ल व असेम्ब्ल करून राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केला. याच स्पर्धेत बिझनेस प्रेझेंटेशनमध्ये महाविद्यालयाच्या संघाने दुसरा क्रमांक पटकावला. तसेच स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये स्किड पॅड, ऑटोक्रॉस, स्पीड स्नॅप, एंडयुरन्स मध्येही उत्कृष्ट प्रदर्शन करत सर्व साधारण विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत 28 संघानी सहभाग नोंदविला होता. विजेत्या संघाला रू.1,00,000 व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सदरील संघास ट्रान्समिशन स्टीरींग, ब्रेकिंग डिपार्टमेंटमध्ये विभागले होते. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाच्या नाविण्यपूर्ण डिझाईनमुळे त्यांना फयुयल इकोनॉमिमध्ये सुध्दा पारितोषिक मिळाले. या संघामध्ये 25विद्यार्थ्यांचा सहभाग होता. संघप्रमुख म्हणून सिध्देश्वर तांगडे यांनी जबाबदारी सांभाळली. तर या विद्यार्थ्यांना प्रा.दीपक गोपेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.

या विद्यार्थ्यांचा नुकताच महाविद्यालयात औरंगाबादचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मृत्याल यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी म.शि.प्र.मंडळाचे उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, महाविद्यालयाचे संचालक डॉ.उल्हास शिऊरकर, उपप्राचार्य डॉ.संजय कल्याणकर, विभाग प्रमुख डॉ.सत्यवान धोंडगे, प्रा.प्रकाश तौर, प्रा.रूपेश रेब्बा, डॉ.राजेश औटी,डॉ.गजेंद्र गंधे आदींची यावेळी उपस्थिती होती. तसेच विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल म.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोळंके, सरचिटणीस आ.सतीश चव्हाण, स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य विवेक भोसले, विश्वास येळीकर आदींनी अभिनंदन केले आहे.

————————————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close