In Short

विश्व विक्रमी किल्ले बनवा उपक्रम

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठा कडून विश्व विक्रमी किल्ले बनवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ५ जानेवारी रोजी पुण्यात हा उपक्रम होणार असून शहरातील मुलांनी व तरुणांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते १२ या वेळेत पी. के इंटरनॅशनल स्कुल चाकण, नांलदा इंग्लिश मिडीयम मांजरी, संत ज्ञानेश्वर विद्यालय चाकण चौक, पी.सी. एम.सी स्कूल पिंपळे गुरव या ठिकाणी किल्ले तयार होणार आहेत. सुमारे ५०० किल्ले तयार करण्याचे नियोजन असून त्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षकांची टिमही तयार करण्यात आली आहे. याच वेळेत युवा महोत्सव देखील होणार आहे. शहरातील ज्या मुलांना यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी हडको एन ९ येथील श्री स्वामी समर्थ केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Close