In Short

पाेलिओ लसीकरण मोहिमे दरम्यान शिवसेनेतर्फे जनजागृती

यंदाची पल्स पोलिओ मोहिम रविवारी (१९ जानेवारी) राबवण्यात आली. यावेळी ० ते ५ वर्षापर्यंतच्या मुलांना पोलिओ डोस देण्यात आला. गोगानाथनगर, बेगमपुरा वार्डातील विविध पल्स पोलिओ बूथवर नगरसेवक सचिन खैरे यांच्या पुढाकाराने शिवसेनेतर्फे भेट देऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी बेगमपुरा पोलिस स्टेशनचे पीएसआय प्रमोद देवकाते, विभाग प्रमुख सुरेश पवार, प्रमोद मोरे, सुशील कचरे, सतीश पाटील, संतोष पवार व इंद्रप्रस्थ बहु-उद्देशीय क्रीडा मंडळ बेगमपुरा , औरंगाबाद याचे सदस्य विनोद लहारे (अध्यक्ष), उल्हास लहारे (उपाध्यक्ष), संजय कचरे , सुशील कचरे (सचिव), वंदना कचरे, संतोष गहिरे (सदस्य), रजनी देशपांडे, इंदर फत्तेलष्कर, वैभव लकडे यांची उपस्थिती होती.

Related Articles

Close