In Short

आजपासून मिळणार बारावीचे हॉलतिकीट

बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) २१ जानेवारीपासून ऑनलाइन पद्धतीने www.mahahscboard.in या संकेतस्थळावर महाविद्यालयाच्या लॉग इनमध्ये डाऊनलोडसाठी उपलब्ध होतील. काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. महाविद्यालयांनी परीक्षेची प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. दुरुस्त्या विभागीय मंडळात जाऊन करता येतील.

Related Articles

Close