Visit Our Website
In Short

अपघातापासून सुरक्षा : महामार्ग पोलिसांचा उपक्रम

खुलताबाद महामार्ग पोलिसांचा पुढाकार कठडे तुटले त्या ठिकाणी रिफ्लेकटर पट्या

पावसाळ्यात महामार्गावर अपघात होवून अनेकांचे जीव जातात. हे प्रमाण कमी  व्हावे म्हणून महामार्ग पोलिसांनी विविध  उपक्रम करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी  NH 52 वेरुळ घाटात खुलताबाद, म्हैसमाळ येथे मोठ्या प्रमाणावर येण्याऱ्या पर्यटकांच्या वाहनाचा घाटात तुटलेल्या कठड्यामुळे अपघात होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने महामार्ग पोलीस केन्द्र खुलताबादचे सहायक पोलिस निरीक्षक नामदेव चव्हाण, सहाय्यक फौजदार  माळी, पोलीस नाईक पांडुरंग शिंदे, शांताराम सोनवणे, चांगदेव कोरडे वतीने घाटात सुरक्षाच्या दृष्टीने रिफ्लेकटर पट्या लावल्या. या कठड्यांची तात्काळ दुरुस्ती व्हावी यासाठी देखील प्रयत्न होत आहेत. पावसाळ्यात गाडी वेगाने चालवू नका, हेल्मेटचा वापर करा, चार चाकीचे वायपर दुरुस्त ठेवा, अपघातातील जखमींना तात्काळ मदत करा, जवळचा पोलिसांना आणि महामार्ग पोलिसांना माहीती द्या असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव चव्हाण यांनी केले आहे.

Related Articles

1 thought on “अपघातापासून सुरक्षा : महामार्ग पोलिसांचा उपक्रम”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close