Visit Our Website
Happenings

मल्टिप्लेक्स मधील खाद्यपदार्थांचे दर कमी केल्याबद्दल आयनॉक्स तापडियाचे मनसे कडून अभिनंदन.

इतरांना दिली 2 दिवसांची मुदत वाढ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महारातष्ट्रभरात मल्टिप्लेक्स मधील खाद्यपदार्थांचे दर कमी व्हावे यासंबधी आंदोलन हाती घेतले होते, त्याची दखल घेत उच्च न्यायालयाने देखील तसे आदेश मल्टिप्लेक्स चालकांना दिले होते. त्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती त्या अनुषंगाने १ ऑगस्ट पासून दर कमी होणे व बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी मिळणे आवश्यक होती त्याप्रमाणे आयनॉक्स तापडिया थेटर ने दर कमी केले आहेत. त्यांचे अभिनंदन व आभार म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेने कडून त्यांचा सत्कार केला व ज्या थेटर मालकांनी अजून यासंदर्भात पावले उचली नाहीत त्यांना अजून २ दिवसांची वाढीव मुदत देण्यात आली असून अन्यथा २ दिवसांनंतर होणाऱ्या परिणामास सज्ज रहा,असा इशारा मनसे कडून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close