Happenings

चोरट्यांनी दुकान फोडले

पुंडलिकनगर भागातील दुकान फोडून चोरट्यांनी सिगारेट्सचे बॉक्स व रक्कम लंपास केली. न्यु हनुमान नगर गारखेडा परिसरातील रहिवासी मयुर प्रभाकर काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, काळे हे त्यांच्या एम के ट्रेडर्स या दुकानाचे शटर बंद करून ते सात फेब्रुवारी रोजी घरी गेले होते. त्यानंतर ते १० फेब्रुवारी रोजी जेव्हा दुकानात आले. तेव्हा त्यांना त्यांच्या दुकानाचे शटर तुटलेले आढळले. यांच्या दुकानातून २५ हजार रुपये किमतीची चिल्लर, ३५ हजार रुपये किमतीचे सिगारेट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. मयूर प्रभाकर काळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार हिंगे करत आहे.

Related Articles

Close