Happenings

भाच्यानेच केला मामीवर अत्याचार

घरात भांडे नव्हते म्हणून स्वयंपाक करण्यासाठी गेली होती पिडीता 

कामासाठी गाव सोडून शहरात आलेल्या पिडीतेवर अत्याचार झाल्याची घटना घडली. दुर्देव असे सख्या मामीवर भाच्यानेच बलात्कार केल्याची फिर्याद १२ फेब्रुवारी रोजी छावणी पोलिस ठाण्यात  नोंदवण्यात आली. विकास उर्फ बबुदंर २२ असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या बाबत अधिक माहीती अशी पिडीत आणि तीचा पती हा कामासाठी काही दिवसांपूर्वी शहरात आले होते. त्यामुळे घरात स्वयंपाक करण्यासाठी भांडे नव्हते. त्यामुळे पिडीतेच्या पतीने  तीला स्वयंपाक करण्यासाठी शेजारीच रहाणाऱ्या भाच्याच्या घरात पाठवले. त्याचाच फायदा घेत विकासने पिडीतेवर अत्याचार केले. ४ फेब्रुवारी ही घटना घडली. त्या नंतर पिडीतेने पोलिसांकडे धाव घेताच विकासने पळ काढला. त्याला शोधण्यासाठी छावणीचे पथक रवाना झाले आहे. पोलिस निरीक्षक पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ठोकळ पुढील तपास करीत आहेत. आरोपी विकास हा  मजुरी काम करतो तर पिडीतेचा पती देखील मजुरी काम शोधाण्यासाठीच शहरात आले आहेत.
– 

Related Articles

Close