Visit Our Website
Happenings

पक्षीप्रेमींनी वाचवला मांज्यात अडकलेल्या कावळ्याचा जीव

तीन दिवसांपासून गारखेडा येथील सूतगिरणी क्वार्टर परिसरात निलगिरीच्या उंच झाडावर  मांजामध्ये कावळ्याचा पाय अडकला होता. त्याखालून ११ के.व्ही.ची विद्युत तार लटकत होती. येथील पक्षीप्रेेमी विशाल जाधव यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्वरीत त्यांनी पक्षी अभ्यासक डॉ. किशोर पाठक यांना माहिती दिली. सर्पमित्र मनोज गायकवाड यांना त्यांनी घटनास्थळी पाठवले. पक्षीप्रेमी पवन जाधव यांनी हायड्रोलिक शिडी असलेली गाडी आणली. महावितरणचे वायरमन राजू रत्नपारखी आणि विशाल जाधव यांनी एक तासासाठी फिडर बंद केले. हायड्रोलिक शिडी ३० फूट उंच नेली. तरीही आणखी २० फूट अंतर बाकी होते. मग २० फुटांचा बांबू आणून त्यास वरील बाजूस कोयता लावण्यात आला. मनोज गायकवाड व पवन जाधव यांनी मांजा कापण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत खाली जमलेल्या लोकांनी मोठी सतरंजी धरली. मांजा कापताच कावळा अलगद सतरंजीवर पडला. आणि मोठ्या प्रयत्नानंतर कावळ्याचा जीव वाचला. तीन दिवसांपासून रिकाम्या पोटी लटकत असणा-या पक्ष्याचा जीव वाचवल्यावर उपस्थितांचे चेहरे आनंदित  झाले होते. कावळा मांजामध्ये अडकल्याने त्याला जखम झाली होती. डॉ. किशोर पाठक यांच्या संस्थेत त्याला उपचारासाठी दाखल केले गेले. संजय लवटे, बाळू लहाने, विशाल घायाळ यांनी देखील कावळ्याला सुखरूप खाली उतरवण्यासाठी मदत केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close