Happenings
तीन दिवस मनसेप्रमुख राज ठाकरे शहरात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे तीन दिवस शहरात उपस्थित असणार आहेत. राज्य दौऱ्याची सुरुवात पक्षप्रमुख राज ठाकरे हे औरंगाबाद शहरातूनच करणार आहेत. १३ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी शहरात उपस्थित राहून दाधिकारी कार्यकर्ते व विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. येत्या मनपा निवडणुकीत सर्व ११५ जागा मनसे लढवणार आहे. अनेक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिली. १३ फेब्रुवारी रोजी राज ठाकरे चार वाजता बाय रोड येणार आहेत. १४ व १५ तारखेला ते शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटना तसेच इतर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर औरंगपुरा येथील महावीर भवन येथे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. त्या वेळी बाळा नांदगावकर, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. अशी माहिती मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिली. यावेळी आमदार राजीव पाटील,मराठवाडा संपर्क प्रमुख जावेद शेख, सतनामसिंग गुलाटी, सुमीत खांबेकर, प्रकाश महाजन, सुहास दाशराथे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पानसे म्हणाले की, मागील पंचवीस वर्षात स्थानिक खासदार चंद्रकांत खैरे यांनी केवळ महापलिकेतच लक्ष घातले. आणि शहराची दुरावस्था करून ठेवली. मनपात सत्तेत बसलेल्यांनी केवळ कॉन्ट्रॅक्ट आणि कमिशन यामुळे महानगरपालिका डबगाईला आणली. असा आरोपही त्यांनी केला.