Visit Our Website
Happenings

आशा ट्रेडर्स तर्फे केरळ राज्याला सात लाखाची औषधी.

२५००० लोकांना पुरेल एवढी औषधी.

केरळराज्याची परिस्थिती जलमय झाली होती. आता हळूहळू पुर ओसरायला सुरुवात झाली आहे. परंतु आता केरळराज्याला रोगराईची भीती भेडसावत आहे. या साठी औरंगपुऱ्यातील आशा ट्रेडर्स चे मालक हरिशचंद्र ज. मित्तल यांनी केरळ राज्यासाठी सात लाखाची औषधी गुरुवारी सकाळी अकरा वाजता शिव अर्थ फाऊंडेशनला दिली.

ओसरत्या पुरामुळे राज्यात ताप,खोकला,सर्दी,अनेक संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. यासाठी लागणा-या औषधींचा समावेश यात आहे. तसेच बचावकार्याच्या वेळी अनेक लोक जखमी झाले त्यांना अँटी बायोटिक औषधी, गर्भवती महिलांना कॅल्शिअमची औषधं सुद्धा उपलब्ध करून दिली आहेत. २५००० लोकांना पुरेल एवढी औषधं केरळ ला पाठवत असल्याचे त्यांनी सांगितले. माध्यमांमधून केरळ राज्याची परिस्थिती पाहिल्यावर हे आपण केलेच पाहिजे आणि लोकांनी सुद्धा मदत करण्याचे आवाहन मित्तल यांनी केले.
या वेळी निलेश मित्तल,निखिल मित्तल,नितीन भारुका, आशिष अग्रवाल यांची उपस्थिती होती.

आपण सुद्धा करू शकता मदत.

शिव अर्थ फौंडेशन
खाते क्र. ९१८०१००४१६२०८८०
पेटीएम क्र. ७३८५६३११११

या वर आपण निधी पाठवू शकता आणि कार्यात सहभागी होण्याचे आवाहन शिव अर्थ फौंडेशनचे ऋषिकेश प्रदीप जैस्वाल यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close