Breaking News

शिवसेनेच्या बाल्लेकिल्यात मनसेचे शक्ती प्रदर्शन

मनपा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेच्या बाल्लेकिल्यात गुरुवारी १३ फेब्रुवारी रोजी मनसेने शक्तीप्रदर्शन केले. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ते शहरात दाखल झाले. त्या नंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या रॅलीत ते सहभागी झाले. रॅलीसाठी प्रामुख्यात क्रांती चौक,  गुलमंडी, टिव्ही सेंटर असे शिवसेना प्रबळ असलेले भाग रॅलीसाठी निवडण्यात आले होते.
दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी  राज ठाकरे शहरात आले आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर ठाकरे हे शहरात पहिल्यांदाच शहरात आले आहे. त्यांचे स्वागत देखील त्याच पद्धतीने करण्यात आले. गळ्यात भगवे रुमाल, भगवे झेंडे आणि फेेटे आणि बँड लावून ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. महावीर चौक,  क्रांती चौक, गुलमंडीत सत्कार स्विकारत औरंगपुरा मार्गे ते टिव्ही सेंटर येथे आले. त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन ते हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आले. त्या ठिकाणी देखील कार्यकर्त्यांची गर्दी होती. सोबत बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, अविनाश अभ्यंकर, अभिजीत पानसे, जावेद शेख हे देखील आले आहेत. स्थानिक पदाधिकारी सुमीत खांबेकर, सतनामसिंग गुलाटी, भास्कर गाडेकर, बिपीन नाईक, गौतम आमराव, वैभव मिटक, संकेत शेटे, संदिप कुलकर्णी, राज काथार  आदींनी रॅलीच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले. काही दिवसांपूर्वी पक्ष प्रवेश केलेले हर्षवर्धन जाधव, सुहास दाशरथे, प्रकाश महाजन यांची देखील यावेळी उपस्थिती होती.
– 
रॅलीत पाकीटमारांचा सुळसुळाट
मनसेच्या रॅलीत सहभागी झालेल्या काही पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे यावेळी पाकीट, मोबाईल  व सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्याचे प्रकारे घडले. स्थानिक पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Close