Breaking News

लढाई बंद कमरे मे नहीं मैदान मे लढी जाती है – कन्हैय्याकुमार

भाकप उमेदवार प्रचारसभेत ते बोलत होते.

लढाई बंद कमरे मे नहीं मैदान मे लढी जाती है, म्हणूनच सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरलो. भाजपने किती आश्वासने पूर्ण केले यावर कोणी बोलत नाही. कारण मतदारांचे लक्ष जाती धर्मावर वळवण्यात आले.
असे प्रतिपादन युवा नेता डॉ. कन्हैय्याकुमार यांनी केले. आमखास मैदान येथे गुरवार (दि. १७) औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे भाकप आणि डाव्या लोकशाही आघाडीचे उमेदवार अॅड. अभय टाकसाळ यांच्या प्रचारार्थ कन्हैय्याकुमार यांच्या सभेदरम्यान ते बोलत होते. यावेळी अण्णासाहेब खंदारे, प्रा. राम बाहेती, अश्फाक सलामी, सांडू जाधव, भाऊसाहेब झिरपे, ऍड. मनोहर टाकसाळ, सुभाष लाेमटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देणे शहीदांचा अपमान

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची भाषा भाजप करत आहे. भारतरत्न पुरस्कार स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या शहीद भगतसिंग यांना दिला पाहिजे. ज्या सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली त्या सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देणे हा शहीदांचा अपमान आहे. सावरकरांना भारतरत्न दिला तर भगतसिंग यांना भारतरत्न पुरस्कार देऊ नका.
कन्हैयाकुमार म्हणाले सावरकरांना भारतरत्न देण्याची भाषा करणाऱ्यांनी शहराच्या सावरकर चौकातील रस्ता खड्डेमुक्त करावा. शहराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. समांतर पाणीपुरवठा योजना तीनशे कोटींवरून सोळाशे कोटींवर गेली. ठेकेदार आणि नेत्यांची मिलबाटकर खायेंगे ही नीती आहे. राज्यात बेरोजगारी, शेतकरी अात्महत्या अशा ज्वलंत प्रश्नांना बगल देत भाजप-शिवसेनेचे नेते काश्मीर, राममंदिराच्या नावावर मते मागत आहेत. आदिवासी, शेतकरी ,सर्वसामान्यांवर होणारा अन्याय, अत्याचाराविरोधात आमची लढाई सुरू आहे. जाहिरातीच्या हॅमरींगचा फंडा सत्ताधाऱ्यांनी अवलंबिला आहे.

सत्ताधाऱ्यांची निती, नियत चांगली नाही
स्वत:ला हजार रूपयात विकू नका

सत्ताधाऱ्यांची निती, नियत चांगली नाही. जाती धर्माच्या नावावर मतदान करण्यापेक्षा जबाबदार नागरीक म्हणून मतदान करावे, पैसे घेऊन मतदान करू नका, स्वत:ला हजार रूपयांत विकू नका असे आवाहन कन्हैय्याकुमार यांनी या सभेत केले. कम्युनिस्टांची ताकद काय आहे‌?.. असा प्रश्न विरोधक विचारत आहेत. कम्युनिस्टांनी स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती दिली हा इतिहास आहे. सत्ता मिळेल किंवा नाही मात्र कम्युनिस्ट जनतेच्या प्रश्नांसाठी कायम रस्त्यावर आहेत. असा दावा त्यांनी यावेळी केला.
सभेपूर्वी कन्हैय्याकुमार यांचा शहरातून रोड शो करण्यात आला. उमेदवार अॅड. अभय टाकसाळ यांनी भूमिका स्पष्ट केली . भास्कर लहाने यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Close