Breaking News
फॅमिली रेस्टॉरंट अँड बार मध्ये चालू असलेल्या पार्टी वर गुन्हे शाखेचा छापा
मद्यधुंद अवस्थेत तरुण तरुणींचा साऊंड सिस्टिम वर नाच
मोठमोठ्या शहरांमध्ये साऊंड सिस्टीमच्या तालावर मद्य सेवन करत चालणाऱ्या पार्ट्यांची प्रचिती आज औरंगाबाद शहरात दिसून आली. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने कोकणवाडीतील शेल फॅमिली रेस्टॉरंटमध्ये छापा टाकत हॉटेल मालका सह चार जणांना ताब्यात घेतले आणि ग्राहकांना चौकशी करून सोडून दिले.
मैत्री दिनानिमित्त खास पार्टीचे आयोजन या हॉटेल मध्ये करण्यात आले होते. यात अनेक तरुण तरुणी शामिल होते. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या पार्टीचे आयोजन फेसबुकवर करण्यात आले होते. या साठी एक खास पास सुद्धा तयार करण्यात आला होता. एक हजार रुपये किमतीचा पास हॉटेल मध्ये मिळत होता यात पार्टी साठी ५०० रुपये प्रवेश फी आणि ५०० रुपयांचे खाद्य कुपन होते. अनेक उच्चभृ घरातील तरुण तरुणी या पार्टीत असल्याचे देखील सूत्रांकडून सांगितले. तर अनेक तरुणी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे देखील सांगितले. या छाप्यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू होते.