Uncategorized

अनुराधा पाटील यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

औरंगाबाद येथील प्रसिध्द मराठी कवयित्री अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या काव्यसंग्रहास वर्ष२०१९ साठीचा सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा पुरस्कार बुधवारी जाहीर झाला. अकादमीचे सचिव डाॅ. के. श्रीनिवास राव यांनी पाटील यांच्यासह देशातील २३ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वाेत्कृष्ट साहित्यकृती व लेखकांच्या नावांची घोषणा केली. १ लाख रूपये व ताम्रपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. २५ फेब्रुवारी २०२० रोजी पुरस्काराचे वितरण होणार आहे. अनुराधा पाटील ४० वर्षांपासून सातत्याने लिहीत असून ‘दिवसेंदिवस’, ‘तरीही’, ‘वाळूच्या प्रत्रात मांडलेला खेळ’ हे त्यांचे प्रसिध्द काव्यसंग्रह आहेत.

Related Articles

Close