Visit Our Website
Today's Special

३० सप्टेंबर- लातूर, उस्मानाबाद चा मोठा भूकंप आजच्या दिवशी झाला.

३० सप्टेंबर २०१८ दिनविशेष

वार : रविवार (षष्ठी श्राद्ध)

शके : १९४०

सुर्योदय : ०६.२९

सुर्यास्त : १८.२८

नक्षत्र : रोहिणी

तिथी : कृ. पंचमी, कृ. षष्ठी

३० सप्टेंबर दिनविशेष

लातूर, उस्मानाबाद चा मोठा भूकंप आजच्या दिवशी झाला .

१९९३ सालच्या ३० सप्टेंबरला भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ३.५६ वाजता लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत एक भूकंप झाला, त्याला लातूरचा भूकंप म्हटले जाते. ह्या भूकंपाचे केंद्र सोलापूरच्या ईशान्येस ७० किमी अंतरावर होते. रिश्टर स्केलवर ६.०४ तीव्रता मोजला गेलेल्या ह्या भूकंपात अंदाजे ७,९२८ माणसे मृत्युमुखी पडले, १५,८५४ जनावरांचा मृत्यू झाला, तर सुमारे १६,००० लोक जखमी झाले. ५२ गावांतील ३० हजार पूर्णपणे जमीनदोस्त झाली तर १३ जिल्ह्यांतल्या २ लाख ११ हजार घरांना तडे गेले. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा व लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यांना ह्या भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसला. ह्या दोन तालुक्यांतील एकूण ५२ गावे उद्‌ध्वस्त झाली

३० सप्टेंबर – इतर दिनविशेष

२००० : देशातील रासायनिक उद्योगाची वाढ आणि प्रगतीसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाऊंडेशनतर्फे ’हॉल ऑफ फेम’ हा विशेष पुरस्कार जाहीर
१९९८ : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) सेंद्रीय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांना ‘शांतिस्वरुप भटनागर’ पुरस्कार जाहीर
१९९४ : गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ’दादासाहेबफाळके पुरस्कार’ प्रदान
१९६१ : दुलीप करंडकाचा पहिला सामना मद्रास (चेन्‍नई) येथे खेळला गेला.
१९४७ : पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश
१९३५ : हूव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.
१८९५ : फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.
१३९९ : हेन्‍री (चौथा) इंग्लंडचा राजा बनला.
१९८० : मार्टिना हिंगीस – स्विस लॉनटेनिस खेळाडू
१९७२ : शंतनु मुकर्जी ऊर्फ ’शान’ – पार्श्वगायक
१९३३ : प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक (मृत्यू: २८ डिसेंबर २००६)
१९६१ : चंद्रकांत पंडित – क्रिकेटपटू
१९२२ : हृषिकेश मुकर्जी – चित्रपट दिग्दर्शक (मृत्यू: २७ ऑगस्ट २००६)
१९०० : एम. सी. छागला – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८१)

२००१ : केन्द्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री, काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज माधवराव शिवाजीराव शिंदे यांचे उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात विमान अपघातात निधन (जन्म: १० मार्च १९४५ – मुंबई)
१९९८ : चंद्राताई किर्लोस्कर – ’भूदान’ चळवळीतील कार्यकर्त्या
१९९२ : गंगाधर देवराव खानोलकर – लेखक व चरित्रकार, ‘अर्वाचीन मराठी वाड़्‍मय सेवक’ या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले. (जन्म: १९ ऑगस्ट १९०३)
१९८५ : चार्लस रिच्टर – अमेरिकन भूवैज्ञानिक (जन्म: २६ एप्रिल १९००)
१६९४ : मार्सेलिओ माल्पिघी – इटालियन डॉक्टर (जन्म: १० मार्च १६२८)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close